अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

दादा फ्रेंड्स क्लब कडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील कमलापूर येथे दादा फ्रेंड्स क्लब कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष कमलापूर उपसरपंच सचिन ओलेटीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच पुरुषोत्तम येजुलवार, आविस सल्लागार शंकर रंगुवार, तिरुपती किर्तीवार, ग्राम पंचायत सदस्या इंदुताई पेंदाम, ग्राम पंचायत सदस्या मायाताई आईलवार, नारायण दुर्गा, सतक्रती कुमारी, समय्या येजुलवार, राजन्ना पोरलावार, दादाजी अडगोपुलवार, संदिप येमुलवार, किष्ठाय्या पेंदाम, व्यंकटेश कडार्लावार, आविस सल्लागार माधव कुडमेथे, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख सह आविस व बीआरएसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना व्हॉलीबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

ग्रामीण व्हॉलीबॉल या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार आविस सल्लागार शंकर रंगुवार व तिरुपती किर्तीवार तर तृतीय पुरस्कार ग्राम पंचायत कमलापूर यांच्याकडून ठेवण्यात आले. कमलापूर येथील दादा फ्रेंड्स क्लब कडून आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी सुदीप रंगुवार, श्लोक आत्राम, राजू उल्लेदला, संस्कार दुर्गे, निवास चालूरकर यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जेष्ठ पत्रकार श्रीधर दुग्गीराला यांनी मानले. या उदघाटनीय सोहळ्याला कमलापूर गावातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होती.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago