अहेरी येथे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विशेष उपस्थितीत प्रधानमंत्री मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रम संपन्न.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम “मन की बात” चा १०० वा भाग अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी आयोजित.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- येथील माता कन्यका परमेश्वरी मंदिर सभागृहात देशातील १०० वा मन की बात कार्यक्रम माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष उपस्थितीत आज संपन्न झाले, या कार्यक्रमाला अहेरी तालुक्यातील जिमलगटा, उमानुर, देचलीपेठा, कमलापुर, गुड्डीगुडम, पेरमिली, मेडपल्ली, आलापल्ली, नागेपल्ली, महागाव, वांगेपल्ली, देवलमरी या गावातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते जवळपास ३५० च्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ चा रविवारी सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी अहेरी येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह देश-विदेशात ४ लाख ठिकाणी प्रसारण होते. भाजपाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची सोय केली होती, अहेरी विधानसभा क्षेत्रातही अहेरी सहित अनेक ठिकाणी हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले.

काल मन की बातचा १०० व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वांची हजारो पत्रे व संदेश मिळालेत. मी हे पत्र वाचण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करतो. अनेकदा पत्र वाचताना भावूक होतो. भावनेत वाहून गेलो, पण वेळीच स्वतःला सांभाळले. १०० व्या भागावर, मी मनापासून सांगतो की, तुम्ही अभिनंदन केले आहे, तुम्ही सर्व श्रोते पात्र आहात असे म्हणाले.

पुढे बोलतांना ,’सेल्फी विथ डॉक्टर’ चा माझ्यावर प्रभाव, जम्मू आणि काश्मीरच्या पेन्सिल स्लेटचा केला उल्लेख, मेक इन इंडियाचे उत्पादन, हीलिंग हिमालय सुरू करणाऱ्या प्रदीप यांच्याशी मोदीजी यांचा संवाद,स्वच्छ सियाचीन, सिंगल यूज प्लॅस्टिक यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी बोलले. संपूर्ण जग पर्यावरणाबाबत चिंतेत आहे. त्यात मनाची तयारी महत्त्वाची आहे. युनेस्कोचे डीजी (UNESCO) यांनी संवाद साधला. त्यांनी मला ‘ मन की बात’ साठी अभिनंदन केले. भारत आणि युनेस्कोचा इतिहास खूप जुना आहे. युनेस्को शिक्षणावर काम करत आहे. २०३० पर्यंत आम्हाला सर्वत्र दर्जेदार शिक्षण द्यायचे आहे. असे संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान देशवासीयांना संवाद साधला. ह्यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम करीता भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री तसेच भाजपा पदाधिकरी तसेच कार्यकर्ते यांचा सहकार्य लाभले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago