वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का, फक्त 1 जागा आली निवडून.

वाशिम 18 जागांचे निकाल पक्षा नुसार काँग्रेस – 05 वंचित बहुजन आघाडी – 02 शिवसेना शिंदेगट – 01भाजपा – 01 (आ.लखन मलिक समर्थक) (शेतकरी सहकार पॅनल) राष्ट्रवादी – 03 शिवसेना ठाकरे गट – 03 इतर – 03

सीमा सुरोशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्ह्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना जोरदार झटका लागला. मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितिच्या झालेल्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडून येऊ शकला आहे. मानोरा बाजार समितीत भावना गवळी यांच्या समर्थनानं पॅनल टाकण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

वाशिम बाजार समितीत खासदार भावना गवळी यांच्या गटाला केवळ एक जागा मिळाली ती पण काँग्रेसच्या मदतीने राखण्यात त्यांना यश आले. वाशिम बाजार समितीत भावना गवळी यांनी लक्ष दिले नव्हते मात्र मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत भावना गवळी यांच्या समर्थनाने स्वतंत्र पॅनल उभे करण्यात आले होते. मात्र, तिथे महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवत 14 जागा पटकावल्या आहेत. भावना गवळी यांच्या पॅनलचा तिथे सुपडा साफ झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. खरतर ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली. कारण भाजप व शिवसेना (शिंदे) यांचे उमेदवार नाममात्रच होते. वाशिम बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे नेते व जि. प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना (दोन्ही), वंचित आणि भाजप यांचं शेतकरी विकास पॅनल विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं शेतकरी सहकार पॅनल अशी लढत झाली यात शेतकरी विकास पॅनलला 15 पैकी 9 जागांवर विजय मिळाला. शेतकरी सहकार पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले . हमाल, व्यापारी व अडते मतदार संघात स्वतंत्र तीन उमेदवार निवडून आले आहेत. सभापती पदाच्या निवडणुकीत या तिघांचे मत निर्णायक ठरणार आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago