✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनामित्त जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात अनुकंपा तत्वावरील उमेदवार व सरळसेवेने नियुक्ती झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे उपस्थित होते.
अनुकंपा तत्वावर साहिल मेंढे यांना महसुल सहाय्यक, नेहा ताबिया यांना शिपाई, सिध्देश्वरी डोर्लीकर यांना औषध निर्माण अधिकारी, देवाशिष महाकाळे कनिष्ठ अभियंता, अनिकेत उगले आरोग्य सेवक, प्रतिक्षा गव्हाळे कनिष्ठ सहाय्यक, विशाल गऱ्हाड कनिष्ठ सहाय्यक, वैभव लोंढेकर कनिष्ठ सहाय्यक, स्वप्नील मुजबैले कंत्राटी ग्रामसेवक, पल्लवी भगत कनिष्ठ सहाय्यक, शशांक बोरकुटे वरीष्ठ सहाय्यक तर संदेश भोंगाडे यांना अनुकंपावर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणुन नियुक्तीपतत्रे देण्यात आली.
सरळसेवेने निवड झालेल्या उमेदवारांना देखील यावेळी नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. संकेत संजय थुल, वृषभ ज्ञानेश्वरराव गडकरी, प्रतिक्षा दत्तूजी चोपडे, स्वप्नील विठ्ठलराव चौधरी, साक्षी रामभाऊ इटनकर यांची भूकरमापक तथा लिपिक म्हणुन निवड झाली आहे. तसेच श्रीकांत पुंडलीकराव पेंदाम यांची राज्य कर निरिक्षक, श्रीकांत आनंदराव मोहितकर दुय्यम निरिक्षक व शुभम ताराचंद्र काबंळे यांची सहाय्यक मोटार वाहन निरिक्षिक म्हणुन नियुक्ती झाली असून त्यांना यावेळी नियुक्तीपत्रे देण्यात आली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…