वर्धा येथे अवैध रित्या देहव्यापार करणाऱ्या टोळीचा स्पर्दाफास, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हात मोठ्या अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. त्यात पोलीस अधीक्षक यांनी जोरदार कारवाईचा सपाटा लावत अनेक अवैध व्यवसाय बंद पाडले आहे. वर्धा शहरात अशाच एका अवैध अनैतीक देहव्यापार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी वर्धा जिल्ह्यात चालणाऱ्या विविध अवैध व्यवसायावर कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखे अंतर्गत स्वतः च्या नियंत्रणाखाली विशेष पथक तयार केले आहे. पथक इंचार्ज सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कापडे यांना आदेशीत केले आहे. त्यावरुन सदर पथकातर्फे संपुर्ण जिल्ह्यात चालणाऱ्या वेगवेगळ्या अवैध व्यवसायावर कारवाई करणे सुरु असतांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली कि, वर्धा शहरात एका ठिकाणी अवैधरित्या
अनैतिक देहव्यापार सुरु आहे. त्या ठिकाणी एक पुरुष स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता मुली व महिलांना पैशाचे आमीष दाखवुन येणाऱ्या ग्राहकांशी शरिरसंबंध करण्यास प्रवृत्त करुन मुली व महिलांकडून वैश्या व्यवसाय करुन घेत आहे. खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने पोलिस अधीक्षक, वर्धा यांना माहिती देवून त्यांचे आदेशाने विशेष पथकासह पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे मदतीने एक बनावट ग्राहक बनवुन स्वराज रेस्टॉरेंट, पवन लॉजचे बाजुला, मेन रोड, वर्धा येथे छापा घातला. यावेळी घटनास्थळी खोली क्र. २ मध्ये आरोपी क्र.२ मयुर नंदकुमार ठाकरे, वय ३० वर्ष रा. रामनगर वार्ड वर्धा, प्रदिप लक्ष्मणराव कुबडे वय ६२ वर्ष रा. धंतोली चौक वर्धा, एक महिला आरोपी असे सर्व त्यांचे आर्थिक फायद्याकरीता एका महिले कडून देहव्यापार करवून घेत असतांना मिळून आले.

यातील आरोपी हे अवैध वैश्या व्यवसाय करणे करीता वापरीत असलेले तिन ॲन्ड्रॉईड मोबाईल किंमत २०,०००/- रु ५०० रू च्या दोन नोटा किंमत १,०००/- रू असा एकूण जुमला किंमत २१,०००/- रू चा माल जप्त करुन यातील आरोपीतांचे विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे कलम ४, ५, ७ स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (सिट अधिनियम पुननिर्मीत) अन्वये गुन्हा नोंद करुन कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पो.स्टे. वर्धा शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक), वर्धा व पोलीस अंमलदार
मिना कौरती, विशाल मडावी, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, प्रफुल वानखेडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा,(विशेष पथक), वर्धा यांनी केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोग फंडातून खूप वर्ष प्रलंबित असलेले काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हातकणंगले:- तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत च्या…

3 mins ago

गोंडपिपरी येथे आमदार सुभाष धोटे यांचा कार्यकर्ता स्नेह मिलन मेळावा संपन्न, कार्यकर्ता मध्ये उत्साहाचे वातावरण.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी दि.19:- लक्ष्मणराव जगगन्नाथ कुंदोजवर…

13 mins ago

एकात्मिक बालविकास प्रकल्प गोंडपिपरी बीट धाबा तर्फे पोषण अभियान माह जनजागृती.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30…

24 mins ago

पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलींसमोरच केली पतीची निर्घृण हत्या.

वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक…

30 mins ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

23 hours ago