वाशिम जिल्हात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिराचे आयोजन.

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- दिव्यांग सशक्तीकरण विभाग,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार यांच्या एडीप योजनेंतर्गत वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण करण्यासाठी २ मे ते ५ मे २०२३ या कालावधीत तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

वाशिम तालुक्यासाठी २ मे रोजी जिल्हा परिषद शाळा, जूनी जि.प. जवळ, सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी तोतेवाड यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०९३९८४० आहे.

मंगरूळपीर तालुक्यासाठी ३ मे रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, अकोला चौक, मंगरूळपीर येथे सकाळी ८ ते दुपारी १२ ,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले असून गटविकास अधिकारी के.व्ही.घुगे यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७३७८९०८९९० आहे.

मानोरा तालुक्यासाठी ४ मे रोजी एल.एस.पी.एम हायस्कूल येथे सकाळी ८ ते दुपारी १२,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी बी.टी.बायस यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी ९८६०१५०९८१ आहे.

कारंजा तालुक्यासाठी ५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी एस.पी.पडघान यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी ९४२१७३५७२१ आहे.

तपासणी शिबिरामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त, उत्पन्न दाखला रु. २२५००/- किंवा त्यापेक्षा कमी प्रति माह, आधार कार्डची झेरॉक्स प्रत,२ पासपोर्ट छायाचित्र या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

32 mins ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

23 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago