इनामधामणी ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या साफसफाई कामगाराच्या विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे इनामधामणी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सध्या कडक उन्हाळा महिना सुरू आहे. 40 डिग्री जवळ पारा गेला आहे. तसेच कोव्हीड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालले असून संभावितः धोका लक्षात घेऊन, ग्रामपंचायती मधील काम करीत असणारे सफाई कर्मचारी वर्गाला भर उन्हातान्हात साफसफाईचे कष्टाचे काम करावे लागते. इतक्या कडक उन्हात ते आपल्या गावची सेवा करीत आहेत त्याचबरोबर दिवसेंदिवस कोव्हीडच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे सफाई कर्मचारी हा आपल्या जिवाची पर्वा न करता गावच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असतात परंतु स्वत:च्या जिवाची सुरक्षा पासून वंचित आहेत. त्यांना अत्यावश्यक असणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक ऋतू प्रमाणे सुरक्षा पोषाख देणे हे ग्रामपंचायत मार्फत देणे हे कायदेशीर बंधनकारक असतानाही आजतागायत दिले गेले दिसत नाही. तसेच सफाई कामगार हा तुंबलेल्या गटारीत उतरून घाण काढत असतो, कचरा साफ करत असतो त्यामुळे विविध प्रकारचे आजारांना आमंत्रण देत असतो परिणामी त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो.आशा कठीण परिस्थितीत त्यांना काम व आपले कर्तव्य बजावले लागत आहे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन ऊन, पाऊस, वारा, थंडी मध्ये राहण्यासाठी सुरक्षित असा हक्काचा निवारा घर नसल्याने त्यांना खडतर परिस्थितीत आपले जिवन जगावे लागत आहे. तरी या सफाई कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी तसेच त्यांचे जीवन मानवी हक्कांने जाण्याकरिता गरजेचे अत्यावश्यक सुरक्षेसाठी लागणारे साहित्य मिळाव्यात तसेच वैद्यकीय सुविधा आणि हक्काचा निवारा मिळण्यासाठी आम्ही खालीलप्रमाणे मागणी आम्ही आद.ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्या कडून करीत आहोत.
प्रमुख मागण्या –
१) ग्रामपंचायतीमधील काम करणारे सफाई कामगार तसेच विद्युत पुरवठा करणारे कामगार यांना शासनामार्फत हक्काचे सर्व सोयीसुविधायुक्त घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे.
२) ग्रामपंचायतीतील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करण्यात यावी. व वैद्यकीय औषध दवा हा ग्रामपंचायतींच्या खर्चाने मोफत उपलब्ध करून देण्यात यावा.
३) सफाई करणारे कर्मचारी यांना काम करत असताना सुरक्षाचा दृष्टिकोनातून हॅन्ड ग्लोज (हातमोजे), गमबुट (पायामध्ये बूट), हॅट (सुरक्षा टोपी) हातपाय धुण्यासाठी हॅडवॉश, साबण, सॅनिटाझर, मास्क देण्यात यावेत.
४) त्यांना वर्षाभरात ऋतू नुकसान 4 वेळा स्वच्छता करणेकामी पोशाख देण्यात यावा.
५) साफसफाई करणारे कर्मचारी यांना पगार हा समान काम किमान वेतन या कायद्याची अंमलबजावणी करून, मा.कामगार आयुक्त यांनी आखून दिलेल्या निर्देशानुसार मानधन प्रत्येक महिन्यात वेळेवर करण्यात यावे.
६) ग्रामसभेच्या वेळी त्यांना सन्मानाने त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या वेळेस निकालात काढला जाव्यात.
वरील प्रमाणे आमच्या या सर्व मागण्या येत्या 8 दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मिरज तालुका उपाध्यक्ष प्रमोद मल्लाडे, मानतेश कांबळे, अनिल अंकलखोपे, विकास कांबळे,महावीर पाटील, तेजस कोलप, सुनील कोलप, नयन कोलप, संकेत कोलप, आविष्कार कांबळे, बाळासो कोलप, उमेश शिंदे, मौलाना आप्पासो मुलानी, सुविचार कोळी आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…