सावनेर येथील रेमंड कॉलनी वासी नागरी सुविधा पासून वंचित, विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. पण जेव्हा नगर पालिका प्रशासन झोपेचं सोंग घेऊन नागरिकांना सुविधा देण्या ऐवजी त्यांना वाऱ्यावर शोडत असेल तर प्रश्न मांडायचे कुणाकडे असेच चित्र सध्या सावनेर येथील रेमंड कॉलनी प्रभाग क्र.3 येथील नागरिक स्थानिक नगर परिषद प्रशासनाला विचारत आहे.

रेमंड कॉलनी प्रभाग क्र.3 येथील नागरिक नागरी सुविधा पासून बऱ्याच वर्षापासून वंचित असून याकडे प्रशासनाचा डोळेझाक पणा सुरू आहे. नगरपरिषदचे अधिकारी पाहणी करून जातात पण त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही. स्थानिक महिलांनी नगर प्रशासनाला बऱ्याचदा निवेदन दिलेले असून प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे निदर्शनास येत आहे. नगर परिषदेमध्ये प्रशासन असल्यामुळे कोणताही नगरसेवक ढुंकून सुद्धा पाहत नाही हे विशेष.

या कॉलनीमध्ये रोडची सुविधा नाही, नालीची सुविधा नसल्याने सांडपाणी खाली प्लॉटमध्ये, रोडवर साचलेले आहे. त्यामुळे कॉलनीमध्ये रोगराई पसरत असून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन नगरपरिषद सावनेर व उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे सावनेर यांना देण्यात आले. यावेळी सविता येलगंधलवार, विना जाचक, वंदना पेटकर, शिल्पा कुंभारे, वैशाली चापले व शिल्पा कुंभारे इत्यादी महिलांनी निवेदनामार्फत मागणी केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

26 mins ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

23 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago