वानवडी पोलीसाची कौतुकास्पद कामगिरी ! विदयार्थीनीची छेड काढणारा रिक्षाचालक केले जेरबंद……

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- वानवडी पोलीस ठाणे १९०/२०२३, भा.दं.वि. कलम ३५४,५०४ मधील पिडीत विदयार्थीनी या दि. १६/०४/२०२३ रोजी रात्री ११.१५ वा. सुमारास त्यांचे मैत्रिणी सोबत कोरेगाव पार्क येथून जेवण करुन रिक्षा मधून वानवडी येथे असताना सदर रिक्षा चालक याने रिक्षा बाजूला घेवून फिर्यादी यांची छेड काढलेली होती. त्यावेळी घाबरुन जावून त्यांनी तक्रार दिलेली नव्हती. सदर बाबत दि. २२/०४/२०२३ रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे नमूद पिडीत विदयार्थीनीकडून तक्रार प्राप्त झाल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद पिडीत विदयार्थीनीकडे रिक्षा चालक व रिक्षा बाबत काही एक उपयुक्त अशी माहिती नव्हती वानवडी पो.स्टे कडील पोलीसांनी रस्त्यावरील वेगवेगळे सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे माध्यामातून विविध भागात सीसीटिव्ही फुटेज चेक करून व पेट्रोलिंग करुन नमुद गुन्हा करणारा रिक्षाचा चालक नामे सचिन अनिल रणदिवे, वय २५ वर्षे, रा. नवले चाळ, वडगाव शेरी, पुणे याचा गुन्हयात वापरण्यात आलेले रिक्षाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केलेने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये एक रिक्षा कि.रु. ५०,०००/- ची रिक्षा जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक प्रमोद खरबडे वानवडी पोस्टे हे करत आहेत..

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातीन पोलीसांकडून रात्रीचे वेळी कामकाज करणारे व प्रवास करणारे सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की रात्रीचेवेळी आपण प्रवास करताना ज्या प्रवासी वाहनाव्दारे प्रवास करणार त्या वाहनाचा नंबर व आवश्यकतेनुसार ड्रायव्हरचा फोटो प्राप्त करून घ्यावा तसेच कोणतीही भिती दाटल्यास लागलीच पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ किंवा महिला हेल्पलाईन नंबर१०९५ वर त्वरीत संपर्क साधावा.

सदरची कारवाई ही गा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुका श्री. संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, गा. पोलीस उपआयुक्त परि-५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्रीमती पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरबडे, पोलीस हवालदार संतोष मोहिते अतुल गायकवाड, महिला पोलीस अमलदार अश्विनी धामणे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

22 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

1 day ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

1 day ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago