गुन्हे शाखा युनिट ५ ची धडाकेबाज कामगिरी..मोबाईल चोराकडुन चोरीचे ०८ मोबाईल हॅन्डसेट जप्त,


पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

युनिट ५, गुन्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे घडत असल्याने मोबाईल चोरीच्या गुन्हयांना आळा घालुन प्रतिबंध करणेकामी सुचना दिलेल्या आहेत..
त्याप्रमाणे मा. वरिष्ठांचे आदेशान्वये दिनांक २८/०४/२०२३ रोजी युनिट ५. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे असे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीवरुन संशयित इसम नामे आकाश कोंडीबा कावले वय २१ वर्षे रा. स्वारगेट एस.टी. स्टॅण्ड समोर फुटपाथवर पुणे व मुळ रा.मु.पो. उमापुर ता. बसवकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक यास त्याचेकडील पिशवीसह ताब्यात घेतले. त्याचे जवळील पिशवी मध्ये काय आहे असे विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्याचेकडील पिशवीची पाहणी करता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने त्याचे जवळील मोबाईल फोन हे हडपसर, मुंढवा, वानवडी, मार्केटयार्ड भागातून चोरले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडुन एकुण १ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ८ मोबाईल हॅन्डसेट जप्त करुन पुणे शहरातील हडपसर, मुंढवा, वानवडी, मार्केटयार्ड या पोलीस ठाणेचे ८ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

उघडकीस आलेले गुन्हे


१हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ४५६/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९
२. मार्केटयार्ड पो.स्टे.गु.र.नं. ७३ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
३.हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ५६८ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ ४वानवडी पो.स्टे. गु.र.नं. १७१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
५. मुंढवा पो.स्टे.गु.र.नं. १२६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
६. हडपसर मो.स्टे. गु.र.नं. ५६०/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९ 19. ७हडपसर मो.स्टे. गु.र.नं. ५६३ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
८हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ६४२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – १ श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अमलदार, रमेश साबळे, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख व राहुल ढमढेरे यांनी केली आहे.
पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

13 hours ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

1 day ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago