मंत्रालयात 22 पासून प्रलंबीत हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धनच्या प्रस्तावाचे काय झाले? काँग्रेस नेते प्रवीण उपासे यांचा सवाल.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्याबाबत तत्कालीन पालकमंत्री यांच्या आदेशानुसार शासन दरबारी 22 जून 2022 ला पाठविलेल्या प्रस्तावाचे काय झाले? असा संतप्त सवाल हिंगणघाट विधानसभा काँग्रेसचे प्रभारी प्रवीण उपासे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत प्रवीण उपासे यांनी एका निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय हे 100 खाटावरून 400 खाटाचे करून जिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन करण्याबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दि 8 फेबुवरी 22 ला पत्र पाठवून सातत्याने पाठपुरावा केला व याबाबत दि 12 ऑक्टोंबर 22 ला येथील उपविभागीय कार्यालयात मोर्चा नेला होता. परिणामी तत्कालीन पालकमंत्री केदार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी दि 13 जून 22 ला हिंगणघाट येथे शासकीय जिल्हा रुग्णालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव आरोग्य मंत्री यांच्या कार्यालयात मागील एक वर्षांपासून मंजुरीसाठी पडून आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले नसते तर हा प्रस्ताव त्याचवेळी मंजूर झाला असता. परंतु दुर्दैवाने सरकार कोसळले आणि हा प्रस्ताव थंडया बस्त्यात पडलेला आहे.

विध्यमान आमदार ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षा चे सरकार सद्या महाराष्ट्रात आहे परंतु या आमदार महोदयांना मुंबईत आरोग्य मंत्रालयात जाऊन हा प्रस्ताव मंजूर करता येऊ नये याचे आचर्य वाटतं आहे. हिंगणघाट येथे शासकीय जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यासाठी सबळ कारणे आहे. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट हे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर या चार जिल्ह्याचे सीमेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील रूग्णना या रुग्णालयाचा लाभ घेता येईल. या रुग्णालयापासून 45 की मी पर्यंत कुठेही जिल्हा रुग्णालय नसल्याने या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक आहे. नप हिंगणघाट क्षेत्रात जोडून असलेली गावातील जवळपास 70 ते 80 हजार लोकसंख्या या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहे. वरोरा व चिमूर तालुका लोकसंख्या वणी आणि उमरेड अशी एकूण जवळपास 3 लाख लोकसंख्या या रुग्णालयाचा लाभ घेऊ शकते. हिंगणघाट शहरात रेल्वे जंक्शन, एक राष्ट्रीय महामार्ग तसेच आजूबाजूला असलेले आघोगिक क्षेत्र, टेक्स्टाईल्स मिल, जीन इत्यादी इंडस्ट्रीज मधील संभाव्य अपघात संख्या व बरीच कामगार संख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याची आवश्यकता आहे. या उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटाची सुविधा असतांना सुद्धा वर्षाला दीड लाखाचे वर बाह्यरुग्णसंख्या, 79 टक्केच्या वर बेड अक्यूपंशी रेट, 650 चे वर प्रसूती, 582 मोठ्या शस्त्रक्रिया, 645 छोट्या शस्त्रक्रिया, वाढत्या एम एल सी केसेस पोष्टमार्टेम, इत्यादी महत्वाच्या बाबी लक्षात घेता उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असल्याने रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे अत्यन्त आवश्यक आहे.

या परिसरात नेहमी होणाऱ्या अपघातांची संख्या आणि सभोवताल असलेली लोकसंख्येच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता व वैद्यकीय समस्या पहाता येथे विशेष उपचारांनीयुक्त अशा जिल्हा रुग्णालयाची हृदयरोग चिकित्सा, मूत्रपिंड चिकित्सा, मज्जातंतू शल्य चिकित्सा, नवजात शिशू, अतिदक्षता विभाग इत्यादी सेवेने युक्त जिल्हा रुग्णालयाची विशेष बाब म्हणून निर्मिती करण्यात यावी ही माझी दोन वर्षांपूर्वी पासूनची मागणी आहे. या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा प्रवीण उपासे यांनी यावेळी दिला आहे.
निवेदन देतेवेळी नरेंद्र चाफले, हेमंत पोटदुखे, अतुल सायनकार, विजय भगत, भारत उभाड, शंकर जांभुलकर, दिलीप पंडित, संदीप कांबळे इत्यादींची उपस्थिती होती.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

19 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago