सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- देशात दिल्ली सरकार तर्फे वीज ग्राहकांना २०० युनिट वीज मोफत दिल्या जाते. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, केरल इत्यादी राज्यात वीज ग्राहकांना २ ते २.५० रुपये प्रति युनिट दराने वीज पुरवठा केल्या जातो. महाराष्ट्रात मात्र १०० युनिट पर्यंत ३.३६ पैसे दराने, १०० ते ३०० युनिट पर्यंत ७.३४ पैसे युनिट दराने व ३०१ ते ५०० युनिट पर्यंत १०.३७ पैसे दराने वीजेचे बिल आकारण्यात येते. सदर बिलात वीज शुल्क, वीज कर, वीज वाहन कर, इंधन अधिभार इत्यादी शुल्क आकारणी केल्या जाते. त्यामुळे वीज ग्राहकास ७०० रुपये बिल आले असेल तर ५०० रुपये इतर कर मिळवून १२०० रुपयाचे बिल ग्राहकास भरावे लागते. विद्युत वितरण कंपनी तर्फे नवीन कम्प्युटराइज लावलेले मीटर फास्ट असल्यामुळे वीज ग्राहकाने विजेचा वापर कमी केला तरी मीटर मध्ये दुप्पट युनिटचा वापर केल्याचे रीडिंग दर्शविते त्यामुळे वीज ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त वीज बिलाचा भरणा करावा लागतो. वीज वितरण कंपनी तर्फे वीज ग्राहकांना एप्रिल २०२३ चे वीज बिलाचा सोबत ५० रुपया पासून तर ५००० रुपये पर्यंतचे ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉजिट रक्कम भरण्याचे वेगळे बिल पाठविल्यामुळे वीज ग्राहकामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. या घटनेची दखल घेऊन बल्लारपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष भारत थुलकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यासहित कार्यकारी अभियंता तेलंग यांना वीज ग्राहकांना पाठविण्यात आलेले हजारो रुपये रकमेचे ॲडिशनल सेक्युरिटी बिल ताबडतोब रद्द करण्यात यावे अन्यथा शहर विकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळात संजय डुंबरे, सरफराज शेख, अजय चौव्हाण, अशोक भावे, ईश्वर देशभ्रतार, रामदास तडस, वाजिद खान, तुळशीदास चंदनखेडे, नासिर बक्ष, नरेंद्र हिरे, कादर भाई, अरुण लोखंडे, सौ.रेखा मेश्राम, श्रीमती आशाताई भाले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…