रात्रीच्या वेळी मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी येरवडा तपास पथकाकडून रंगेहात पकडले

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ३०/०४/२०२३ रोजी सायंकाळी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस नाईक अमजद शेख व पोआ अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. कल्याणीनगर येथील आगाखान पुलावर एका इसमाचा जबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणारे दोन इसम रेड्डी हॉटेलचे पुढे कल्याणीनगर येथे थांबलेले आहेत. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व अंमलदार अमजद शेख, अनिल शिंदे यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता रईस जाकीर शेख वय २५ रा. बोपाडी पुणे व एक विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले. त्यांचकडे अधिक तपास करता त्यांनी दि. २९/०४/२०२३ रोजी रात्रीचे वेळी आगाखान पुलावर फोन वरती बोलत थांबलेले असताना एका मुलाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावले बाबत सांगून त्याबाबत कबुली दिली ..

सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता त्याबाबत येरवडा पो स्टे गुर नं २८० / २०२३ भादवि ३९२ ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याने व त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास गुन्हयात दि. ३०/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच ताब्यात घेतलेले संशयीत इसम नामे रोहित रणवीरसिंग चिडार वय २१ राजयजवान नगर येरवडा पुणे व दोन विधीसंघर्षित बालक यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी ब्रम्हासनसिटी वडगांव शेरी व आप्पा बळवंत चौक याठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले आहे. सदरबाबत येरवडा पो स्टे येथे खात्री केली असता येरवडा पो स्टे गु र नं २७५/२०२३ भादवि ३९२ ३४ व विश्रामबाग पो स्टे गुर नं ८६ / २०२३ भादवि ३९२ ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याने व त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. असे एकूण ३ गुन्हयातील मिळून दोन मोटारसायकल व ११ मोबाईल असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत व इतर मोबाईल बाबत

तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

सदरची कामगिरी श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग, श्री शशिकांत बोराटे सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. जयदिप गायकवाड, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना अमजद शेख, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, मपोअं रोहिनी भोकसे, उजाता शिरसाठ व वर्षा सावंत यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

6 mins ago

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती दया ; खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…

28 mins ago

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

16 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

17 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

18 hours ago