राजस्थान मधील जालौर मध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा द्या वंचित बहुजन आघाडीचे मागणी.

युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर:’ जिल्हातील काटोल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मुख्याध्यापक शेरसिंग राजपूत यांना फाशीची शिक्षा द्या असे निवेदन भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर पालिकेचे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात निवेदन सादर. राजस्थान सरकारने न्याय न दिल्यास दलित समुदाय संपुर्ण देशात आंदोलन करणार

राजस्थान राज्यात जालौर हत्याकान्डाने भारतातील संपुर्ण दलित समाज भयभीत झाला आहे वर्गातल्या पिण्याच्या पाण्याच्या माठातील पाणी पिल्यामुळे राक्षसी जानवरी प्रव्रुत्ती असणाऱ्या शेरसिंग राजापूत या नराधम मुख्याध्यापकाने इंद्रकुमार देवाराम मेघवाल या तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलाला बेधम मारहाण केली. त्यात उपचारादरम्यान इंद्रकुमार यांचा म्रुत्यु झाला संपुर्ण भारतीयांनी यावर्षी स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव जात पात धर्म पंत विसरून आम्ही सर्व प्रथम भारतीय आहोत अश्या आनंदाने सोहळा साजरा केला असताना इंद्रकुमार सारख्या निष्पाप मुलाला.दलित असल्याच्या कारणावरून व पाण्यासाठी 9 व्या वर्षी जिव गमवावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याला अर्थ काय असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर परिषदचे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांनी निवेदनाच्या माध्यमातुन सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला केला.

या हत्याकांडातील मुख्य आरोपी शेरसिंग राजपूत याला फाशी द्यावी या मागनीकरीता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यानी परिसर दणाणून सोडला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एस डी ओ कार्यालयावर धडक निषेद मोर्चा काढुन देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना मा एस डी ओ साहेबांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. जर का राजस्थान सरकार व केंद्र सरकारनी शिक्षकी पेशाला अपमानित करणाऱ्या निष्पाप मुलाचा बळी घेणारा शेरसिंग राजपूत याला तात्काळ फाशी न दिल्यास देशातील संपुर्ण दलित समाज तिव्र आंदोलन करणार असे निवेदनातून सरकारला इशारा देण्यात आला.

निवेदन देतेवेळी सुधाकर कावळे, मनिष रामटेके, राजेंद्र नागदेवे शंकरराव काळभांडे दिलीपराव लांजेवार, गुलाबराव शेंडे, अनंतराव सोमकुवर, प्रधण्या डोंगरे, सुजाता डबरासे, मिना पाटील, निर्मला रक्षित, प्रधण्या बांगर, अर्चना झिल्पे, सुनिल नारनवरे, गौतम फुले, सुरेश देशभ्रतार, योगीदास निसवादे, प्रफुल्ल सोमकुवर, रामकृष्ण नाईक, तुकाराम देशभ्रतार, दिगांबर भगत, गुलाबराव तागडे, बाबाराव तागडे, धिरुभाऊ सोनटक्के, मधुकर वाघमारे, ओंकार मलवे, रमेश सीयाले, नितिन डबरासे, अशोकराव बागडे, रामराव पाटील, नितिन गायकवाड, बळवंत नारनवरे, मारोती सुरजुसे, रामभाऊ पाटील, ममता बनसोड, सुजाता वाहने, रेशमा नारनवरे, पांडुरंग खोब्रागडे, श्रीकृष्ण ढोके, हिरालाल ढोके, नामदेव रक्षित, नत्थुजी भाजीखाये यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

13 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

15 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago