विदेशी तरुणीकडून नागपुरात सुरू होता देहव्यापार, दलाल सह उजबेकिस्तानची तरुणी पोलिसांच्या जाळात.

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आज अनेक तरुणी झटपट पैसा कमविण्याच्या नादात वेश्या व्यवसाय करत आहे. तर काही मुलांना पैशाचे आमिष दाखवून या देहव्यापार करण्यास भाग पाडले जात आहे. अशीच एक खळबळजनक घटना नागपुर शहरातून समोर आली आहे. उजबेकिस्तान या देशातील एक तरुणी कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लोभाला बळी पडली. तिला नागपुरात बोलावून तिला देहव्यापारात ढकलण्यात आलं.

जास्त पैशाच्या लालसे मुळे अनेक महिला तरुणी वेश्या व्यवसाय मध्ये बळी पडतात. अशीच एक उजबेकिस्तानची तरुणी कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लोभाला बळी पडली. तिला नागपुरात बोलावून देहव्यापारात ढकलण्यात आलं. पण, काल पोलिसांनी हॉटेल मध्ये टाकलेल्या छाप्यात तिला ताब्यात घेण्यात आलं. त्यातून तिची सुटका करण्यात आली. दलालांना अटक करण्यात आली.

नागपूर शहरातील वर्धा रोडवरील असलेल्या एका आलिशान हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमी द्वारानकडून माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या अधिकारावर नागपुर शहरातील एका प्रसिद्ध हॉटेल प्राईडमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चा नागपूर पोलिसांनी स्पर्दाफास केला आहे. याप्रकरणी दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. एका उजबेकिस्तानच्या तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींनीची सुटका केली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने माहितीच्या आधारे हॉटेल प्राईडमध्ये सापळा रचून 2 दलालांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार यांचा समावेश आहे. व्हॉटसअपच्या माध्यमातून हे दलाल ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना तरुणी उपलब्ध करून द्यायचे. या प्रकरणी उजबेकिस्तान येथून आलेली एक तरुणी आणि दिल्ली येथील 2 तरुणींची पोलिसांनी सुटका केली.

या अवैध वेश्या व्यवसायाचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांनी एक बनावटी ग्राहक पाठवला आणि आरोपीने दहा हजार रुपयांचा सौदा करून अजबेकिस्तानच्या मुलीला त्या खोलीत पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार या दलालांना अटक केली.

नागपुर पोलिसांनी तीन तरुणींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवले. आरोपीं कडून सहा मोबाईल, एक चार चाकी गाडी जप्त करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक सारीन दुर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी नेरकर, अनिल अंबाडे, समीर शेख, अश्वीन मांगे, संदीप चंगोले, सुभाष चौधरी यांनी कारवाई केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

8 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

8 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

9 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

9 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

9 hours ago