प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखा हिंगणघाटच्या 4 व 5 मे ला बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले आहे.
भारतीय बौध्द महासभा तालुका व नगर शाखा हिंगणघाटच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती समारोह दिनांक 4 व 5 मे 2023 आयोजित करण्यात आला आहे. “तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांतता राहाणार नाही.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते.
दिनाक 4 मे ला सायंकाळी 5 वा. बुद्धवंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 वा. परिसंवाद असणार आहे त्यात विषय : “भारतीय बौद्ध महासभा, अपेक्षा, वर्तमान वास्तव व भविष्याकालीन वाटचाल यांचे अध्यक्ष म्हणून डॉ. सागर जाधव आंबेडकरी साहित्यीक व विचारवंत, यवतमाळ ये असणार आहे. उद्घाटक म्हणून डॉ. नरेंद्र मनवर हिंगणघाट मुख्यमार्गदर्शक म्हणून प्रा. मुख्यमार्गदर्शक : प्रा. भारत सिरसाट पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक छ. संभाजीनगर विशेष उपस्थिती प्रा. दशरथ महाकाळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता. समुद्रपूर, प्रा. डॉ. महेश म्हैसकर, राहुलभाऊ लोहकरे उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा समुद्रपूर, प्रा. डॉ. राहुल गजभिये प्रा. प्रदिप लोहकरे हे असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 8 वा. ‘एकपात्री नाट्य’ ‘मी रमाबाई आंबेडकर बोलते’ लेखक दिग्दर्शक केवल जिवनतारे नागपूर, सादरकर्त्या पल्लवी जिवनतारे नागपूर
दिनांक : 5 मे रोज शुक्रवार सकाळी 7 वाजता बुद्ध वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर साय. 6 वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यात विषय: “धम्मचळवळ व आंबेडकरी युवक’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धमजी कांबळे उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, मुख्यमार्गदर्शक म्हणून एम. डी. सरोदे, मधुकर वानखेडे, गोरख भगत, राजु फुलझेले, बबीता वाघमारे, सेवकदास खेळकर, बाळा भाले उपस्थित राहणार आहे.
त्यानंतर ‘प्रतीबिंब हे क्रांतीसूर्याचे’ बुद्ध व भीम गीताचा प्रबोधनात्मक अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रा.विजयकुमार पाटील व संच, नागपूर हे हिंगणघाट शहरातील नागरिकांना आपल्या प्रबोधनात्मक गाण्याने प्रबोधन करणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखा हिंगणघाटच्या वतीने करण्यात आले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…