बल्लारपूर शहरात भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने पाच विहारतील धम्म उपासिका शिबिर संपन्न.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम अंतर्गत बल्लारपूर शहर व तालुका शाखेच्या वतीने बल्लारपूर शहरात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दि. 16 ते 23 एप्रिल 2023 पासून पाच बुद्ध विहार मंध्ये दहा दिवशीय “धम्म उपासीका प्रशिक्षण शिबीर” चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शहरातील पंचशील बुध्द विहार बुध्द नगर वार्ड, यशोधरा महिला मैत्रीसंघ संतोषी माता वार्ड, असित बुध्द विहार राजेद्र प्रसाद वार्ड, पाली बुध्द विहार विद्या नगर वार्ड, मैत्रेय बुद्ध विहार गोकुल नगर वार्ड बल्लारपूर येथे सर्व धम्म उपासीका प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दि 2 मे 2023 मंगळवार पाली बुद्ध विहार मंध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भा बौ म बल्लारपूर शहरच्या अध्यक्षा गायत्रीताई रामटेके होत्या तर प्रमुख मार्गदर्शक अशोक घोटेकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, इंजी.नेताजी भरणे, जिल्हाध्यक्ष, ऍड जगदीप खोब्रागडे जिल्हा सरचिटणीस, संदीप सोनोने, जिल्हा उपाध्यक्ष, सपना कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष, सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्ष, कृष्णा पेरकावर जिल्हा सचिव होते. तर प्रमुख उपस्थिती प्रकाश तावाडे, सरचिटणीस चंद्रपूर तालुका, धर्मुजी नगराळे अध्यक्ष राजुरा तालुका, गौतम चौरे सारचिटनिस राजुरा, सुजाता नळे सरचिटणीस राजुरा शहर होते. तसेच या पाचही शिबिराला मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रीय शिक्षिका सपना कुंभारे, सुजाता लाटकर, कविता अलोने, समता लभाने, प्रगतीताई मेश्राम, अनुकला वाघमारे या मंचावर उपस्थित होत्या.

यावेळी सर्व पाहुण्यांचे प्रवेशद्वारावरच पुष्पचा वर्षाव भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून, अगरबत्ती, मोमबत्ती प्रज्वलित करण्यात आली. तसेच या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अशोक घोटेकर यांनी पुष्पमाला अर्पण केली आणि समता सैनिक दलाच्या समावेत बाबासाहेब ना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रथमता या पाचही बुद्ध विहारातील शिबिरामध्ये सहभागी झालेल्या उपासिकांचे मनोगत घेण्यात आले. प्रत्येक उपासिकांनी या शिबिरामुळे माझ्या जीवनात, माझ्या संसारात कसा बदल झाला आणि मी धम्माच्या मार्गाने पुढील कार्य करील तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याला वाहून घेईल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यानंतर मंचावरील प्रमुख मार्गदर्शक अशोक घोटेकर, नेताजी भरणे, एड. जगदीप खोब्रागडे, संदीप सोनोणे, धर्मुजी नगराळे, सपनाताई कुंभारे, सुजाता लाटकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व उपासिकांना संस्थेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या शिबिराला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व केंद्रीय शिक्षकांना बल्लारपूर शहर शाखेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी सरनत्य घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. बल्लारपूर शहरात ही पाच बुद्ध व पाच धम्म उपासिका शिबिरे लावण्याकरता तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता गायत्रीताई रामटेके अध्यक्ष बल्लारपूर शहर, रमण पुणेकर अध्यक्ष बल्लारपूर तालुका, पंचशीला वेले, संगीता ताई शेंडे, अनुकलाताई वाघमारे तसेच बल्लारपूर शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परीक्षण घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी पंचशीला वेले केंद्रीय शिक्षिका यांनी केले तर प्रास्ताविक आयुनी संगीताताई शेंडे केंद्रीय शिक्षिका यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि अध्यक्ष मार्गदर्शन आयुनि गायत्री रामटेके अध्यक्ष बल्लारपूर शहर शाखा यांनी केले. या कार्यक्रमाला बल्लारपूर शहरातून तसेच विविध बुद्ध विहारातून धम्म उपासक-उपासिकांची खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

36 mins ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

23 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago