DNR ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तक्रार दाखल, तक्रारदाराची नुकसान भरपाईची मागणी.

डी. एन. आर. ट्रॅव्हल्स प्रशासनाकडून टोलवाटोलवीची उत्तर

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो. न. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- पुणे येथून एक महिला आपल्या परिवार बरोबर चंद्रपूर ला खाजगी ट्रॅव्हल्सने निघाल्या होत्या. पण त्यांनी बरोबर घेतलेले साहित्य ट्रॅव्हल्स प्रशासनाच्या हगर्जीपणामुळे चोरीला घेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षा बाबत मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे जिल्हा तील शिरोड येथील हुडको कॉलनी येथे राहणाऱ्या सौ. पायल अशोक गांधी या पुणे येथून डी. एन. आर ट्रॅव्हल्स ने रात्री 10.30 वाजता पुणे वरून चंद्रपूर ला प्रवासाला निघाला होत्या. क्रमांक 7 व 8 तिकीटे बुक करून दिनांक: 30 एप्रिल 2023 ला पुणे वरून दोन बॅग घेऊन प्रवास सुरू केला व चंद्रपूरला दिनांक 01 मे ला सकाळी 10.30 वाजता त्या चंद्रपूर येथे पोहोचल्या. सोबत तीन मुले (अपत्य) सुद्धा होती. चंद्रपूर येथे पोहोचल्या नंतर ट्रॅव्हल्स मध्ये ठेवलेल्या बॅग टोकन क्रमांक 7 व 8 त्यांना देऊन त्या क्रमांकाची बॅग परत मागितली असता डी.एन.आर ट्रॅव्हल्स प्रशासनाने क्रमांक 7 ची बॅग परत दिली आणि 8 दिलीच नाही. डी.एन.आर ट्रॅव्हल्स प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे मौलवान वस्तू असलेले बॅग चोरीला गेली की त्यात डी.एन.आर ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्याचा काही हाथ तर नाही ना असे प्रश्न निर्माण झाले आहे.

महिलेने संगीतलेल्या माहितीनुसार क्रमांक 8 च्या बॅगमध्ये किमान एक लक्ष रुपयाचे साहित्य होते. (स्वतः व अपत्यांचे कपडे, लग्न कार्यात द्यायचे कपडे आणि नेकलेस) त्यांनी पुणे येथून चंद्रपूर येथे लग्न कार्यक्रमात लग्नाचा स्वागत समारोह बल्लारपूर येथे होता त्यात सम्मिलित होण्यासाठी ते पुण्यावरून चंद्रपूर येथे आले होते. सौ. पायल अशोक गांधी यांनी चालक, वाहक आणि व्यवस्थापक यांना जेव्हा त्यांच्या कार्यालयात बसून बॅग मागितली. परंतु त्यांनी फार वेळ बसवून ठेवून त्यांचे सोबत अपशब्द बोलले व रुपये 10000/- नगदी घेऊन, परत जा असे म्हटले. नंतर सौ. पायल अशोक गांधी यांनी त्यांना म्हटले की, मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार आहे. तेव्हा त्यांनी तुमच्या तर्फे जे होते ते करा. पोलीस काय करते ते आम्ही बघून घेऊ? अशा प्रकारे अपशब्द वापरले.

एका महिला प्रवासी सोबत तीन मुले घेऊन लांब प्रवास आणि डी. एन. आर. ट्रॅव्हल्स तर्फे त्रासून दिनांक 02 मे 2023 रोजी ट्रॅव्हल्स मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापक ह्या चार व्यक्तीची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. सौ. पायल अशोक गांधी यांनी तक्रारीमध्ये मागणी केली आहे की, त्यांचे कपडे व इतर साहित्य परत मिळवून द्यावे व डी. एन. आर. ट्रॅव्हलच्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सौ. लता वाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक समलवार करीत आहे.

डी.एन.आर ट्रॅव्हलच्या मालकाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदर बाब ही माझ्या कानावर आलेली आहे. आम्ही पिडीतेची नुकसान भरपाई रुपये 10000/- द्यायला तयार आहो.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

20 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago