नागपूर शहरात चक्क पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिरात धाडशी चोरी.

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चक्क पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिराची दान पेटी फोडण्यात आली. या धाडशी चोरीच्या घटनेमुळे नागपुर शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे हाल कसे असेल याचं चित्र दिसून येत.

चोराचे इतके धाडस झाले की त्यांनी चक्क नागपुर शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून असलेल्या श्री केतेश्वर मंदिरातील दानपेटी फोडली. त्यातून 50 ते 60 हजाराच्या जवळ पास पैसे चोरून नेले. हा सर्व प्रकार सुरू असतानाच पोलीस स्टेशन मध्ये जवळपास 20 ते 25 पोलीस कर्मचारी हजर होते. मात्र, ही चोरी एकाही पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागूनच श्री. केतेश्वर मंदिर आहे. येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दानपेटीत मोठी रक्कम जमा होत असते. हीच बाब हेरून चोरट्याने मंदिरातील दान पेटी फोडण्याचा कट रचला. मात्र, पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिरात चोरी करणे म्हणजे खूपच धाडसाचे काम असल्याचे वाटत होते. तरीही बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांची गस्तप्रणाली बिघडल्यामुळे मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडली. दानेपेटीतील रक्कम एका बॅगमध्ये भरली आणि पोलीस ठाण्यासमोरूनच निघून गेला. त्या चोरावर कुत्रे भुंकत होते. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला. गुरुवारी सकाळी सहा वाजता मनोहर पत्रेवार यांचा मुलगा मंदिरात गेला असता त्याला दानपेटी फुटलेली दिसली. त्याने वडिलांना माहिती दिली. पत्रेवार यांनी मंदिराचे विश्वस्त यांना माहिती देऊन तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ‘सीसीटीव्ही’वरील फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे, अशी प्रतिक्रिया तहसीलचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांनी दिली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago