पुण्यात भारी स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ! व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणुक करुन ०१ वर्षापासुन फरार असलेल्या व्यापारी आरोपीस केले अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. २५९ भा.द.वि. कलम ४०६.४२० ३४ या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे हितेश नानकराम आसवानी वय ३५ वर्षे धंदा व्यापार रा. मुळ प्लॉट नं. २५१ दत्त नगर श्रीगणेश निवास शास्त्री नगर अन्नपुर्ण मंदीराच्या पाठीमागे भांडेवाडी बगडगंज नागपुर महाराष्ट्र याने व त्याचा साथीदार व पाहीजे आरोपी नामे भुषन वसंत तन्ना रा. प्लॉट नं. १०६ लव कुश वाठोडारिंग रोड नागपुर यांनी मिळुन बुध्दनगर, गिरीजाबाबा मंदीराजवळ, काळेवाडी, पिंपरी पुणे येथे राधा इंटरप्रायझेस नावाची तात्पुरती फर्म स्थापन करुन त्यांनी पुणे तसेच पिंपरी चींचवड तसेच नागपुर व सांगली जिल्हयातील वेगवेगळ्या भागातील व्यापाऱ्यांकडुन तुप, गुळ, बेदाम, बदाम, सुपारी, रवा इत्यादी माल खरेदी करून पहील्या एक दोन व्यवहाराचे प्रामाणीपणे पैसे देवुन त्यांचा विश्वास संपादर करुन नंतर मोठया प्रमाणावर त्यांचेकडुन माल खरेदी करुन पैसे न देता फरार झाले आहेत. त्यांचेवरती पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन तसेच सांगली येथिल तासगावपोलीस स्टेशन व नागपुर येथे लकडगंज, नंदनवन व तहसील पोलीस स्टेशनमध्ये चार असे एकूण सहा फसवणुकीचे व इतर गुन्हे दाखल असुन तो पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन व सांगली येथील तासगाव पोलीस स्टेशन येथील गुन्हयामध्ये मागील एक वर्षापासून फरार होता. सदर आरोपी हा पिंपळे गुरव पुणे येथे येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने लागलीच मा. वरिष्ठांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पो.अं.सोमनाथ कांबळे, पो. अं. शिवदत्त गायकवाड व पो. अं. अनिस शेख असे मिळून सदर ठिकाणी खात्री करणे करिता रवाना झाले.

सदर ठिकाणी जावुन पाहणी करता दाखल गुन्हयातील आरोपी हा सदर ठिकाणी मिळुन आल्याने पो.उप निरी येवले यांनी लागलीच स्टाफच्या मदतीने शिताफीने त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन स्वारगेट पो स्टे येथे आणुन त्याच्याकडे चौकशी करता त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देषाचे तंतोतंत पालन करून न्याय हक्काची जाणीव करुन देवुन त्यास दाखल गुन्हयात दि.०१/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली असुन त्याने अजुन महाराष्ट्रात किती लोकांना फसवणुक केली आहे. याबाबत अधीक तपास चालू असुन आरोपीकडु रिकवरी करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा अधीक तपास पोलीस उप निरीक्षक येवले करीत आहे.

सदरची कामगीरी ही मा. श्री प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मर्तना पाटील साो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२. पुणे शहर. मा.श्री. नारायण शिरगावकर साो. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सोमनाथ जाधव यांच्या सुचना व आदेशान्वये तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत सदे पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले व पो.हवा. मुकुंद तारु, पो. अं. सोमनाथ कांबळे .पो.अं. शिवदत्त गायकवाड, पो.अं. फिरोज शेख, पो. अं. प्रविण गोडसे पो. अं.अनिस शेख पो.अ. रमेश चव्हाण .पो. अं. संदीप घुले पो.अं. दिपक खेदाड पो.अं. सुजय पवार यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

18 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago