समुद्रपुर येथे भिंतींचा विटा फोडुन हॉटेल मध्ये चोरी, समुद्रपुर पोलिसांनी कारवाई करत चोराला ठोकल्या बेड्या.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर:- पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक चोरीची घटना समोर आली आहे. समुद्रपुर येथील बस स्टाॅप परीसरात स्थित असलेल्या वैभव उपहार गृह हाॅटेल मध्ये मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत माल लंपास केला आहे. चोरीची ही घटना समोर येतात शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडील यांचे बस स्टाॅप परीसर समुद्रपुर येथे वैभव उपहार गृह हाॅटेल असुन, सदर हाॅटेल ते दोघे मिळुन चालवितात. ते त्यांचे हाॅटेल दि. 04 मे रोजी फिर्यादी यांचे वडील हे हाॅटेल उघडण्या करीता गेले व त्यांनी हाॅटेल उघडले, ते हाॅटेलचे आत असलेल्या शेडमध्ये गेले असता, शेडच्या दरवाजा त्यांना उघडा दिसला व पैशाचे गल्यामध्ये ज्यात नगदी पैसे ठेवुन होते ते डब्बे शेडमध्ये खाली पडुन होते, त्यामध्ये पैसे नव्हते. त्यामुळे फिर्यादीचे वडीलांनी फिर्यादीस माहिती दिली असता, ते सुध्दा तेथे गेले. व त्यांनी हाॅटेलची बारकाईने पाहणी केली असता, त्यांना त्यांनी ठेवलेले नगदी 17,000 रू. मिळुन न आल्याने, सदरचे पैसे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घटना ता.वेळी हाॅटेलचे टिनाच्या शेडचे गेटवरून शेडमध्ये प्रवेश करून, हाॅटेल च्या मागच्या दरवाजा च्या बाजुला असलेल्या भिंतींचा विटा फोडुन हात घालुन दरवाजाचे कडीकोंडा काढुन हाॅटेलचे आत प्रवेश करून चोरून नेले आहे, अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून अज्ञात चोरट्या विरूध्द नमुद कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

या चोरीच्या गुन्ह्याचा तपास पो.स्टे. डि.बी. पथक करीत असुन, तपासादरम्यान चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपी शोध घेत असतांना, पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून यातील नमुद आरोपी हा मौजा हिरडी फाटा, राज्य महामार्ग क्र 264 लगत असलेल्या साई मंदिराचे ओट्यावर संषयास्पद रित्या मिळुन आला. त्याचे जवळील स्कुलबॅगची पाहणी केली असता, त्यात वरील नमुद वर्णनाप्रमाणे नगदी 10,300 रू. मिळुन आल्याने, आरोपीस सदर रक्कमेबाबत सखोल विचारपुस केली असता, त्याने सदरची रक्कम समुद्रपुर परीसरातील बंद हाॅटेलमध्ये रात्र दरम्यान चोरी केल्याचे सांगितल्याने, तसेच त्याचे जवळ असलेली मोटर सायकल त्याने चंद्रपुर येथील गांधी चौक परीसरातुन चोरून आणल्याचे सांगितल्याने, मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरेापीचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी नगदी 10,300 रू. व सदर गुन्ह्यात वापरलेली वरील नमुद वर्णनाची चोरीची मोटर सायकल असा जु.किं. 60,300 रू. चा माल जप्त केला. तसेच घटनास्थळावरून गुन्हा करण्याकरीता वापरलेला एक लोखंडी राॅड किं. 100 रू. जप्त करण्यात आला असुन, आज पावेतो जु.किं. 60,400 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरेापीस सदर गुन्ह्यात रितसर अटक करून, त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर करून आरेापीचा दि. 06 मे पावेतो पि.सी.आर. प्राप्त करण्यात आला आहे. आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकल चोरीबाबत पो.स्टे. चंद्रपुर शहर येथे अप क्र. 304/2023 कलम 379 भा.द.वी. चा गुन्हा नोंद असुन, सदर पो.स्टे. सोबत संपर्क करून आरोपी अटकेबाबत माहिती देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे मार्गदर्शनात स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

19 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago