✒️राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन कर्जत:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. डीजे च्या मोठ्या आवाजाने एक शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज काल कार्यक्रम कुठलाही असो डीजे लावण्याची परंपरा वाढत आहे. परंतु डीजे किती जीवघेणा ठरू शकते हे कौडाणे येथून समोर आले आहे.
मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली सर्हास डीजे चा वापर करण्यात येत आहे. डीजे या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होऊन अनेक नागरिकांना याचा त्रासच नाही तर ते जीवघेणेही ठरते आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
एक महिण्या अगोदर हनुमान जयंतीला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. डीजे या मोठ्या आवाजामुळे एका शिक्षक अशोक बाबूराव खंडागळे वय 58 वर्ष कोमात गेले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शिक्षक अशोक बाबुराव खंडागळे वय 58 वर्ष असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे तालुका कर्जत येथे गेले होते. तेथे डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दिनांक ०९/१०/२०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील रामपूर,कन्नेपल्ली,खमनचेरु, या गावात कॉर्नर सभा घेण्यात…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात प्रचाराचा जोर…