पुण्यात जवळच्या मैत्रिणीनेच केला मैत्रिणीचा घात; तब्बल 69 लाखांने केली फसवणूक.

आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मदत मागताना मदत मागणारा हा गाय असतो पण त्यांचं काम झाल की तोच मदत करणाऱ्याचे ऋण विसरून त्यालाच दगा देतो, मैत्रिणीवर विश्वास करण एका मैत्रिणीला खूप भारी पडल. पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चांगल्या मैत्रीनेच आपल्या मैत्रीनीचा घात केल्याचा प्रकार समोर आला आहे.

एक जवळच्या मैत्रिणीने तिला पैशाची अडचण असल्याचं सांगून मैत्रिणीला कर्ज घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर कर्जाचे काही हफ्ते भरले आणि नंतर हप्ते न भरता तब्बल 69 लाखांची फसवणूक केली आहे. त्यानंतर माझे काका पोलीस आहेत. ते सगळं बघून घेतील अशा धमक्या देखील मैत्रिणीला दिल्या. या प्रकरणी 39 वर्षीय महिलेने पोलिसांत धाव घेतली त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. शशीकांत वसंत लोणकर वय 56 वर्ष, सुशिल वसंत लोणकर, उत्तम शेळके यांच्यासह 3 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण??
एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला अडचणीत असल्याचं सांगितलं त्यानंतर तिच्या नावावर कर्ज घेण्यासाठी सांगितलं. त्या मैत्रिणीने कर्ज घेतलं. त्यानंतर काही महिने अडचणीत असलेल्या मैत्रिणीने हफ्ते भरले मात्र त्यानंतर हफ्ते भरायला नकार दिला. पीडित मैत्रिणीला दर महिन्याला 1 लाख 70 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागत आहे. मैत्रिणीने 69 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

पैसे न देता थेट धमकी…
या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला मैत्रिणीकडे दाद मागायला गेल्या असतात. त्यांनी मारुन टाकण्याची धमकी दिली. माझे काका पोलीस आहे, ते पाहून घेतील, असं सांगण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. फिर्यादीने राहिलेले पैसे परत मागितले असता त्यांना धमकाविण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघीही मैत्रीणी एकाच सोसायटीमध्ये राहतात. मला अडचण आहे तर मला मदत कर आणि 50 ते 60 लाखांची गरज आहे. त्यामुळे कर्ज घे. मी सगळे हफ्ते भरेन. मला कर्ज मिळत नसल्याने मदत मागत असल्याचंही सांगितलं आणि 80 लाखांचं कर्ज काढलं. फिर्यादीच्या मैत्रिणीने तिला माझा काका सुशिल लोणकर हा समर्थ पोलीस ठाण्यात पोलीस आहे. त्यांना तुझे नाव सांगेन, अशी धमकी दिली

मारहाण आणि धमकी….
पैसे मागायला गेले असता. त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांनी सुशिल लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तू तिला दिलेले पैसे विसरुन जा. तुला काय कायदेशीर कारवाई करायचे आहे, ती कर असे उत्तर दिले आणि मैत्रिणीच्या घरी गेल्या असता. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना खाली पाडून केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

8 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

8 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

9 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

9 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

9 hours ago