पेरिमिली येथील सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न, १११ जोडपी विवाहबद्ध.

राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचा पुढाकार!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेरिमिली:- येथे लोकमंगल प्रतिष्टानने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात गोरज मुहूर्तावर १११ जोडप्याचे शुभमंगल करण्यात आले.यावेळी लोकमंगलचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी उपस्थित दर्शवून नववर – वधूना शुभ आशीर्वाद दिला.

पेरिमिलीच्या प्रांगणात सायंकाळी नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी हिंदू, गोंडी, माडिया व बौद्ध वर-वधूचाही त्यांच्या धर्म पद्धतीने विवाह लावून देण्यात आला. सर्व वर – वधूना रेशीमगाठी बांधताना शुभाशिर्वाद देण्यासाठी गावच्या सरपंच किरण नैताम, माजी पं. स. प्रशांत ढोंगे, पं. समिती माजी सभापती बोड्डाजी गावडे, बापू सडमेक, मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी, जि. प. माजी सदस्य रामरेड्डी बंडमवार, पल्लेचे सरपंच राजू आत्राम, उपसरपंच राजू सोयाम, भाजपचे तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री, नगरसेवक विकास उईके, तसेच पेरिमिली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून पेरिमिली लगीनघाई दिसत होती. सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या. सायंकाळ पर्यंत सुमारे हजारोंच्या संख्येत वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला.आहेर, रुखवत व इतर विधिकार्याचीस्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली. यावेळी विवाहबद्ध झालेल्या या सर्व वर- वधूना मानाचे आहेर देण्यात आले. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व वर-वधूना स्त्री जन्माचे महत्व समजावून सांगितले. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्रीभ्रूणहत्या करू नका अशी शपथ सर्वांना देण्यात आली. त्यानंतर सर्व वर-वधूची वरात ढोल ताशांच्या गजरात सामूहिक काढण्यात आली. अम्ब्रिशराव महाराज यांनी वर-वधूचे कन्यादान केले.

सायंकाळी गोरज मुहूर्तावर अक्षता पडल्यानंतर प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सामूहिक विवाह सोहळ्याचे नेटके गडी महाकाली मंडळाने नियोजन केले होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

11 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

12 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

14 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

15 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

19 hours ago