वाशिम: विवाहित महिलेने युवकाला लग्नाचं आमिष दाखवत उखळले पैसे, पोलिसात तक्रार दाखल.

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने एका अविवाहित युवकाला लग्नाचं आमिष दाखवत त्याच्याकडून पैसे उकळ्याची घटना समोर आली आहे.

काय आहे घटना….
एका विवाहित महिलेने एका अविवाहित युवकाला सांगीतले की, मी माझ्या नवऱ्याला सोडून देते आणि तुझ्याशी लग्न करते असे म्हणत विवाहितेने तरुणाची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केली. या प्रकरणी पीडित तरुणाने वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाशीममधील हे तरुण-तरुणी असून त्यांचे दोघांचे तरुणीच्या लग्नाआधी एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र या दोघांच्या नात्याला घरच्यांचा विरोध असल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतरही ती या तरुणाच्या संपर्कात राहिली. तरुणीच्या लग्नानंतरही त्यांच्यात संवाद सुरु होता. या दरम्यान विवाहितेने पीडित तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळले.

मी माझ्या नवऱ्यापासून फारकत घेते आणि तुझ्याशी लग्न करते असे अश्वासन या विवाहितेने पीडित युवकाला दिले. तिच्यावर असलेल्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याने अनेकदा तिला पेसे दिले. मात्र तिने त्याच्या शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली. याबाबत युवकाने वाशीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाशीम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वाशीममधील या पीडित युवकाचं नात्यातील मुलीवर प्रेम होते. परंतु घरचा विरोध असल्याने तिने दुसऱ्या मुलासोबत लग्न केले. परंतु तिने लग्नानंतरही पीडित युवकास भुलथापा मारत मी फारकत घेऊन तुझ्याशी लग्न करते म्हणून वारंवार पैश्याची मागणी केली. पीडित तरुणाने अनेकदा तिला पैसेही दिले.

मात्र पैश्याची मागणी वाढत गेली. विवाहितेने लग्नाचे आमिष दाखवून आपली शारीरिक व आर्थिक फसवणूक केली हे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर त्याने वाशीम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. आता पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

17 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago