माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून येताना झालेल्या अपघातातील मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील चिटूर येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत आयोजीत शासकिय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून परत येताना रंगधामपेठा जवळील दुबापल्ली येथे 26 एप्रिल बुधवारी टॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात लक्ष्मीदेवपेठा येथील तीन जण ठार तर 26 जण जखमी झाले होते. मृतात दोन महीला व एका पुरुष व्यक्तीचा समावेश होता. या अपघातातील तीन मृत व सव्वीस जखमिंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम महाराज आत्राम यांनी आर्थिक मदत केली.

अपघातात मृत व जखमी कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची असुन गंभीर जखमींना तेलंगणा राज्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघातातील मृत व जखमी कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र अजुनही ही मदत मिळाली नाही. माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना ही बाब कळताच त्यांनी दिनांक ०९ मे मंगळवारी लक्ष्मीदेवपेठा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत व जखमी कुटुंबीयांची भेट घेतली व लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायत कार्यालयात मृत व जखमी कुटुंबीयांना मदतीची रक्कम सुपूर्द केली. व मृत कुटुंबीयांची व जखमी रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. व यानंतर शासकिय कार्यक्रम आयोजीत करताना नागरिकांची उचित काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर त्यांच्या उपचारासाठी प्रशासकीय व्यवस्थेचे अंकिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. राजे अम्ब्रिशराव आत्राम हे वेळोवेळी संकटात धावून येतात त्याचा प्रत्यय यावेळी पुन्हा एकदा आला असुन दिलेल्या मदतीबद्दल मृत व जखमींच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सोबत सिरोंचाचे नायब तहसीलदार सय्याद साहेब, आरडा माजी सरपंच रंगू बापू या क्षेत्राचे पटवारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, माजी सरपंच चंद्रय्या सदनापू, तालुकाध्यक्ष शंकर नरहरी तालुका महामंत्री माधव कासर्ला, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश पदमाठींटी, जिल्हा मोर्चा सचिव दिलीप सेनिगारापू, संतोष पडालवार, तालुका उपाध्यक्ष भास्कर गुडीमेडला, वसंत डूरके, ज्येष्ठ नेते गजानन कलाक्षेपवार, तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत, देवेंद्र रंगू, श्रीकांत शुगरवार, सोशल मीडिया प्रमुख सागर मुलकाला, श्याम बेज्जानी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

11 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

12 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

14 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

15 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

19 hours ago