धोकादायक पद्धतीने सिलेंडर गॅसची रिफिलिंग करणारे गुन्हे शाखा युनिट -२ च्या जाळ्यात 72 सिलेंडर जप्त तीन जनावर गुन्हे दाखल.

डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड निवडणे

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी ता ९:- भरलेल्या गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या रिकाम्या सिलेंडर मध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरणा करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट -२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत .या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४३घरगुती सिलेंडर, ०३ व्यावसायिक व्यापारातील सिलेंडर, छोटे २६ असे एकूण ७२विविध कंपन्यांचे गॅस सिलेंडर जप्त करून ०३ जनावर कारवाई केली आहे. १) विष्णू ज्योतीराम सुतार वय २४, वर्ष रा. सदाशिव कॉलनी ,सानेचाळ ,पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव ,मुळगाव मु.पो.विजयनगर, हनुमान मंदिर शेजारी, ता.देवणी जि.लातुर २)अतुल श्रीहरी पांचाळ वय २५,वर्ष ,रा.सदाशिव कॉलनी ,सानेचाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव ,पुणे मु.पो. कोहोळनुर ता.जळकोट जि.लातूर ३) जयराम सर्जेराव चौधरी वय २२ वर्षे ,रा. देवा मिटकरी यांची रूम ,लमान तांडा नेरे दत्तवाडी ता.मुळशी ,जि.पुणे मुळगाव मु,पो. कुंभारी पो.बागी बोबडे ता.जिंतूर ,जि.परभणी असे अटक केलेल्या ही आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात काही इसम अवैध्यरित्या धोका पत्करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापरातील गॅस सिलेंडर ,छोटे सिलेंडर ,तसेच व्यावसायिक विवाह वापरातील सील पॅक सिलेंडर मधून गॅस दुसऱ्या रिकाम्या गॅस सिलेंडर टाकीमध्ये भरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकातील पोलीस नाईक देवा राऊत आणि पोलिस हवालदार जयवंत राऊत यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पदकाने थेरगाव पदमजीन पेपर मिल जवळील आर्या गॅसे सर्विस येथे छापा टाकून ०२ इसमाना रंगेहाथ ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून भरलेले आणि रिकामे गॅस सिलेंडर ,रिफलींग पाईप, इलेक्ट्रॉनिक वजन काटा,रबरी पाईप, पान्हे,असा एकूण ७८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तेथेच बाजूला एका खोलीमध्ये रिफिलिंग करीत असलेल्या एकाला पथकाने ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून गॅस सिलेंडर सह इतर साहित्य असा एकूण ७१ हजार ५२५रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण ७२ विविध कंपन्यांचे गॅस सिलेंडर जप्त करून ०३ जनाविरुद्ध वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे ,सहपोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उपायुक्त (गुन्हे )स्वपना गोरे ,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे )पद्माकर घनवट ,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, ,पोलिस अंमलदार देवा राऊत ,जयवंत राऊत ,संतोष इंगळे ,सागर अवसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

17 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago