रात्रीच्या वेळी पायी जाणा-या नागरिकांना मारहाण करुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणा-या चोरट्यांची टोळी जेरबंद 

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

युनिट- १. गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०८/०५/२०२३ रोजी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट-१ चे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश साबळे यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की, निखील साळुंखे, अथ अवघडे व प्रितम कांबळे यांनी मागील आठवडयात पुणे शहरांतील वेग-वेगळ्या ठिकाणावरुन रस्त्याने येणारजाणारे लोकांचे मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसकावुन घेतले आहेत. सदरचे मोबाईल ते विकण्यासाठी घेवुन चालले असून सध्या ते महात्मा फुले पाड़ा जवळ गंज पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेले आहेत.त्या अनुशंगाने सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता त्यांनी लागलीय सपोनि. आशिष कवठेकर व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करून त्यांना तशा सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी छापा टाकला असता सदर इसम हे एका काळे रंगाये पल्सर मोटर सायकला टेकुन कोणाचीतरी वाट पहात थांबलेले दिसले. त्यांना लागलीच ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांची नावे १) निखील गोपाळ साळुंखे, वय २० वर्षे, रा. घर नं. ४२६, गंज पेठ, लोहीया नगर, पुणे २) अथर्व अमर अवघडे, वय १९ वर्षे, रा.६३३. गंजपेठ, समाज मंदिरा जवळ, पुणे ३) प्रितम प्रदिप कांबळे, वय २२ वर्षे, रा. ५८५, गंजपेठ, पुणे असे असल्याचे सांगितले.

सदर इसमाची झडती घेतली असता त्यांचेजवळ एका पिशवीत तीन मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले.
रस्त्याने जाणारे-येणारे लोकांकडुन जबरस्तीन हिसकावुन घेतले असल्याचे सांगितले. त्यापैकी एक मोबाईल ऍन्डसेट हा दि. ०३/०५/२०२३ रोजी पहाटे ट्राय मी या कपडयाच्या दुकाना समोर कस्तुरी चौक, पुणे येथे एका फोनवर बोलत
चाललेल्या मुलाचे हातातुन हिसकावून घेतला असल्याचे सांगितले,

सदर बाबत खडक पोलीस स्टेशन गु.र.नं. १४६ / २०२३. भा. द. वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तसेच श्रीकृष्ण टॉकीज, ढमढेरे बोळ, बुधवार पेठ, पुणे येथे आणखी दोन मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन घेतला असल्याचे सांगितले. सदर बाबत फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.७५/२०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. आरोपी यांचेक कडुन एक बजाज पल्सर मोटर सायकल व ०३ मोबाईल फोन असा एकूण १,२५,०००/- रु किंचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपकडुन खडक व फरासखाना पोलीस स्टेशन कडील असे एकूण दोन जबरी चोरीचे गुन्हे उचडकीस आणून आरोपी व मुद्देमाल पुढिल कारवाईकामी संबंधीत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यातआलेले आहेत.

सदर आरोपी प्रितम प्रदिप कांबळे याचेवर यापूर्वी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न मारामारी असे गुन्हे दाखल असुन त्याचेवर ०२ वर्षा करीता तडीपार कारवाई करण्यात आली होती.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १, पुणे शहर, श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-4 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, शब्बीर सय्यद, सपोनि आशिषकवडेकर, पोलीस अंमलदार, अमोल पवार, निलेश साबळे, इम्रान शेख अय्याज दडीकर, आण्णा माने, शुभम देसाई शंकर कुंभार यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

21 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago