समाजही मला विरोध करेल, त्यापेक्षा आत्महत्या करणं चांगलं, नागपुरात समलैंगिक मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरात कुणी नसताना तिने सिलिंग फॅनला दोरी बांधून आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी लीहलेही एक सुसाईड नोट मिळून आली.

मी लेस्बियन (समलैंगिक) असून भविष्यात लग्नासाठी खूप अडचणी येतील. लग्नानंतर मला सुखी संसारही करता येणार नाही. समाजही मला विरोध करेल, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ अशी चिठ्ठी लिहून एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तनिष्का असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्का ही सीताबर्डीतील एका महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिचे वडील केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत असून ते मुळचे उत्तरप्रदेशातील आहेत. आई-वडील व लहान भावासोबत गिट्टीखदान परीसरात राहायची. ती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आपल्या कुटुंबियांना त्याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे आई वडिलांना धक्का बसला होता. त्यामुळे तिच्या वागण्याकडे आईवडिल लक्ष ठेवून असायचे. तिला वारंवार समूपदेशन करून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पालकांच्या वारंवार टोकण्यामुळे तनिष्का नैराश्यात गेली होती.

आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. तसेच समलिंगी समुदायातील लोकांनाही याचा धक्का बसला आहे. अशाप्रकारे एखाद्या समलैंगिक तरुणीने आत्महत्या केल्याची ही नागपूर शहरातील वर्षभरातील दुसरी घटना आहे. मार्चमध्ये, एका तृतीयपंथी व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला मुलाशी लग्न करण्यापासून रोखल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केली होती.

या ताज्या घटनेबाबत अधिक माहिती देताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन विठोले यांनी सांगितलं की, आपण समलैंगिक (लेस्बियन) असल्याचं कळाल्यानंतर पीडित मुलीने याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. पण आई-वडिलांनी तिला पाठिंबा दिला नाही. तसेच तिने मुलाबरोबर लग्न करावं, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. यामुळे पीडित तरुणी नैराश्यात गेली. यातूनच तिने रविवारी घरात कुणी नसताना सिलिंग फॅनला दोरी बांधून आत्महत्या केली.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

एकात्मिक बालविकास प्रकल्प गोंडपिपरी बीट धाबा तर्फे पोषण अभियान माह जनजागृती.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30…

8 mins ago

पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलींसमोरच केली पतीची निर्घृण हत्या.

वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक…

14 mins ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

23 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

1 day ago