चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
चोपडा:- येथील बारीवाड्यात सूर्यवंशी बारी समाज पंच मंडळ, बारी समाज महिला मंडळ व नागवेल मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या या गौरव समारंभास याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस सौ.मायाताई महेंद्र बारी (ऐनपुर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षाप्रमाणे व आजादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा होत असताना बारीवाड्यात विविध वयोगटांसाठी हस्ताक्षर, रंगभरण, सामान्य ज्ञान, रांगोळी, वक्तृत्व या स्पर्धाचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना व समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गौरवपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. एलआयसीतर्फे एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल प्रदीप (देवेंद्र)पंडित बारी, सी.बी.निकुंभ हायस्कूल,घोडगांव च्या पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल वसंत आनंदा नागपुरे यांचा व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विजेते ठरलेल्या संजय रघुनाथ बारी यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता व संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पंचमंडळाचे अध्यक्ष किरण बारी, उपाध्यक्ष विलास बारी, सचिव प्रदीप बारी, महिला मंडळाच्या अध्यक्ष रुख्मा बारी, उपाध्यक्षा छाया बारी, नागवेल मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश बारी, समाजातील ज्येष्ठ मोहन बारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय बारी, योगेश बारी, चेतन बारी, शिवदास बारी, भगवान बारी, संजय बारी, सचिन बारी, रवींद्र बारी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. गुणगौरव समारंभास समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…