निवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातून कोट्यवधीची रोकड जप्त, एका व्यक्तीला ठोकल्या बेड्या.

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आहे. मोठ्या प्रमाणात पैस्यानी भरलेली कार पकडली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रशांत धनपाल गांधी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावरून गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित कार थांबवली. त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता वाहनात असलेल्या काही बॅगेत तब्बल 3 कोटी 42 लाख 66 हजार रुपये मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही रोख रक्कम आणि ही गाडी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रशांत गांधी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम त्याला कर्जापोटी भरायची आहे असे त्याने सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हडपसर परिसरातील शेवाळेवाडी परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी एका ब्रिझा गाडीतील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यानंतर गाडीची झडती घेण्यात आली. गाडीच्या डिक्कीत काही बॅग संशयास्पद दिसू लागल्या. पोलिसांनी या बॅगची तपासणी केली असता त्या रोख रक्कम सापडली. त्यानंतर गाडीसह चालकाला पोलिस स्टेशनला आणण्यात आले. संशयित ब्रिजा कार MH 13 CK 2111 ही ताब्यात घेऊन संशयित इसमाला हडपसर पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांच्याकडून सगळी रक्कम जप्त करण्यात आली.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
येत्या काही दिवसांत कर्नाटकच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकातील वेगवेगळ्या शहरात सभा घेत आहेत. या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच हडपसरमध्ये पुणे पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. कर्जासाठी रक्कम भरायची आहे, असं सांगण्यात आलं आहे. मात्र नेमकं प्रकरण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

9 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

9 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

10 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

10 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

10 hours ago