रात्रीच्या वेळी पादचारी इसमास लुटणा-या चोरास चोरीचे एकुण ०८ मोबाइल जप्त केली अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- रात्रीच्या वेळी एकटा असल्याचा फायदा घेवुन पायी चालत जाणारे एका पादचारी इसमास लुटणा-या चोरास त्याचा माग काढून अटक करण्यात व त्याचेकडुन चोरीचे एकूण ०८ मोबाइल जप्त करण्यात खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकास यश आले आहे.

सदर बाबत अधिक माहीती अशी की, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दिनांक ०६/०५/२०२३ रोजी मिसाळ चौक, शिवाजी रोड, पुणे येथे सार्वजनीक रोडवर एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांना धमकावुन त्यांच्याशी झटापट करुन त्यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून बळजबरीने खिशातून रोख रक्कम २५००/- रुपये व मोबाइल तसेच उजव्या हाताचे बोटातील अंगठी जबरदस्तीने चोरून नेली, याबाबत खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक १४३/२०२३ कलम ३९२ भा.प.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे पादचारी व्यक्तिस धमकावून लुटण्याचा प्रकार घडल्याने त्याबाबत वरीष्ट पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांनी तात्काळ दखल घेवुन श्री संपतराव राऊत, पोलीस निरिक्षक गुन्हे यांच मार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार करून त्यांना तपासाबाबत योग्य सुचना दिल्या.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीमती संगिता यादव यांनी तपास पथकास दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास पथकातील अमलदार संदीप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार वाबळे हे गरत करीत असताना त्यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, जबरी चोरी करणारा इसम हा गाडीखाना चौक, मंडई येथे आला असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन जबरी चोरी करणारा आरोपी सजाद मोहम्मद हनीफ शेख, वय ४२ वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी कामशेत पुणे, सध्या रा. लोहीयानगर पेट्रोल पंपजवळ पुणे फिरस्ता यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे…गुन्हयातील अटक आरोपी सजाद मोहम्मद हनीफ शेख, वय ४२ वर्षे यांचेकडुन गुन्हयात जबरी चोरी केलेली १) २५००/- रू रोख रक्कम रु.१२,०००/- किंमतीचा एक व्हिवो कंपनीचा मोबाइल व रु.१५,००० किंमतीची एक सोन्याची अंगठी अंदाजे २.५ ग्रॅम वजनाची अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच या व्यतिरीक्त अटक आरोपीकडुन ओप्पो कपनीचे ०४ मोबाइल व्हिवो कपनीचे ०२ मोबाइल, वन प्लस कंपनीचा ०१ मोबाइल असे एकूण २६,००० रु किंमतीचे ०७ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने अधिक तपास वालु आहे. अशा प्रकारे अटक आरोपीकडुन एकुण १,२५.५००/ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नमुद कारवाई माअपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे श्री. संदिपसिंह गिल, व मा. सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संपतराव राऊत सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर, व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, नितीन जाधव महेश पवार, स्वप्निल बांदल यांचे पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

20 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago