जुगाराचे व्यसनापोटी सराईत घरफोडी करणा-या आरोपीस व चोरीचा माल घेणारे सोनारास अटक करुन केला लाखो रुपये किंमताचा ऐवज केला जप्त

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

युनिट ५. गुन्हे शाख पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- यातील फिर्यादी, वय ५८ वर्षे रा. सोपानबाग सोसायटी, घोरपडी, पुणे यांचे बंगल्याचे नुतनीकरणाचे काम चालु असताना मार्च २०२३ मध्ये त्याचे राहते घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटाचे डिजीटल लॉकर उघडुन त्यातील सोने, चांदी, हिरे चे दागीने व फॉरन करन्सी असा एकुण ४०,००,०००/- रु. कि.चा ऐवज चोरून नेला म्हणुन वानवडी पो.स्टे. गुन्हा रजि.नं. १४२ / २०२३ भा.द.वि.कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद आहे.

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते वरिष्ठांचे आदेशान्वये दाखल गुन्हयाचा युनिट ५ गुन्हे शाखेकडून तपास चालू असताना पुणे शहरातील १०० पेक्षा जास्त रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करणेत आली. तेव्हा युनिट कडील पथकास सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार मुकेश बबन मुने वय २६ वर्षे रा. स.नं. १११, दत्त मंदिराजवळ, सुतारदरा, कोथरूड पुणे हा मिळुन येत नसल्याने त्याचे बाबत अधिक माहीती घेता तो भिवंडी ठाणे येथे राहणेस गेल्याचे समजले त्याचा भिवंडी ठाणे येथे शोध घेतला असता तो व त्याचा मित्र नितीन सुरेश बागडे वय ३२ वर्षे रा. कबडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर हे पुण्यातच असल्याचे समजले. त्यांचा शोध घेता ते दोघे चंदननगर खराडी बायपास पुणे येथे मिळून आले त्यांना ताब्यात घेवून चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन मुकेश मुने याने चोरलेले सोने हे नितीन बागडे याने त्याचे अहमदनगर येथील ओळखीचे सोनारांना विकल्याचे सांगीतले त्या दोघांना दाखल गुन्हयात अटक करून अहमदनगर येथे जावुन तेथील सोनारा कडुन १) ४२,०००/- कि. चे मोत्याचे मणी व पुष्कराज खडे २) १६,००,०००/- रु कि.रु. चे ३२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगडी व ३) ४,५०,०००/- रु कि.ची फॉरेन करन्सी (डॉलर व पाऊंड) असा एकुण २०,९२,०००/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला •आहे. आरोपी मुकेश मुने यास ऑनलाईन बिंगो अॅपवर जुगार खेळण्याचा नाद असुन त्यामुळे त्याने घरफोडी चोरी करुन मिळालेले पैसे जुगारामध्ये हरलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा तपास कृष्णा बाबर, सहायक पोलीस निरीक्षक, युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत. आरोपी मुकेश मुने हा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर ३५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा, पो. निरी. कृष्णा बाबर, अविनाश लोहोटे पोलीस अमंलदार रमेश साबळे प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago