बल्लारपुर येथे वंचित अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मोबा. न. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- वंचित बहूजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आज बल्लारपूर शहरात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला, यावेळी सर्वधर्मसमभाव या भावनेतून एकतेचा संदेश व सर्व धर्मीय धर्मगुरूंनी वाढदिवसाच्या आप आपल्या धर्म प्रथा परंपरा व विधीनुसार दीर्घायुष्याच्या कामना देण्यात आली.

वंचीत बहूजन आघाडी जिला चंद्रपूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या वाढदिवशी सर्वधर्म सामूहिक प्रार्थना सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई व बौद्ध धर्माच्या धर्मगुरूंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व धर्मगुरूंनी आप-आपल्या धर्म पद्धतीनुसार बाळासाहेब आंबेडकर यांच्या दीर्घायुष्य व यशस्वीतेसाठी पूजा – अर्चना केली. पेढे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी इसाई धर्माचे धर्मगुरू फादर श्याम मातंगी, सिख धर्माचे ग्यानी त्रिलोक सिंग, हिंदू धर्माचे पंडित बैद्यनाथ झा, मुस्लिम धर्माचे मौलाना फैजान रजा अब्दुल जब्बार शेख, बौद्ध धर्माचे भंते सूचित बोधी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अध्यक्ष ओम रायपूरे, आभार प्रदर्शन शहर महासचिव उमेश कडू यांनी केले.

यावेळी वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जेष्ट नेते रामदास चौधरी, रमेश लिंगमपल्लीवर, भगीरथ वाळके, सुशील मडावी, विश्वास देशभ्रतार, पराग जांभुळकर, भाले ताई, निळकंठ पाटील, धम्मदीप वाळके, प्रियंकेश शिंगाडे, वंदना गेडाम, नम्रता साव, प्रज्ञा शेंडे आदी वंचित बहूजन आघाडीचे शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

★★★★★★★★★★★★★★★★★★★

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

17 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago