माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी मेडीगट्टा प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण स्थळाला दिली भेट.

सदैव प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- मेडीगट्टा प्रकल्पग्रस्त त्यांच्या मागण्यासाठी मागील अनेक दिवसापासून सिरोंचा तहसील कार्यालया समोर साखळी उपोषणाला बसले आहे. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी याच्या मागण्या जाणून घेतल्या आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

०९ मे मंगळवारी सिरोंचा दौऱ्यावर आलेले गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी गेल्या बारा दिवसापासून सुरू असलेल्या मेडिगड्डा प्रकल्प पीडीत शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. व उपोषणग्रस्तांच्या समस्या ऐकून लवकरच समस्यांचे निवारण करू असे आश्वासन देत आपण नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे याची ग्वाही दिली.

तेलंगाना सरकारने सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे गेल्या पाच वर्षाआधी मेडिगड्डा धरणाचे बांधकाम केले होते त्या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक गाव पाण्याखाली आले होते. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले यासाठी नुकसान भरपाई व अन्य मागण्यासाठी मागील पाच महिना आधी सुमारे एक महिना पर्यंत मेडी गट्टटा प्रकल्प ग्रस्तानी साखळी उपोषण केले होते त्यानंतर अधिवेशन दरम्यान राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मागणी केली होती. तेव्हा त्यांनी लवकरात लवकर तुमच्या समस्यांचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर तेव्हा उपोषण स्थगिती करून जल्लोष केला मात्र त्यानंतरही पाच महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही कोणत्याही हालचाली न दिसल्याने पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा करत मागील बारा दिवसांपासून सिरोंचा तहसील कार्यालया समोर साखळी उपोषणाला बसले आहे. याची माहिती मिळतच सिरोंचा दौऱ्यावर आलेले माजी पालकमंत्री राजे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तुमचा मागण्या मी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि लवकरच पूर्ण होणार अशी उपोषणग्रस्तांकडे आपली बाजू मांडली आणि प्रकल्प ग्रस्तांच्या शिष्टमंडळाला घेऊन मी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट करून देईन व प्रकल्पग्रस्ताच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करू यासाठी जे जे शक्य आहे ते मी करेन याची शाश्वती उपोषण कर्त्याना दिली.

यावेळी उपोषणकर्ते सुरज दुदी, रामप्रसाद रंगुवार, तिरुपती मुद्दाम, विशाल रंगुवार, श्रीनिवास रंगुवार आदींसह भाजपाचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, नायब तहसीलदार सय्यद साहेब, रंगू बापू, संतोष पडालवार, दिलीप शनिगारापु, राजेश संतोष, माधव कासारला, श्रीकांत शुगरवार, वसंत डूरके, यांच्यासह भाजपाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते!

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

11 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

12 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

14 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

15 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

19 hours ago