सोसायटीचे वॉचमन यांना हत्याराचा धाक दाखवून चंदन झाडाची चोरी करणारे सराईत टोळीस कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ठोकल्या बेडया……

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोरेगाव पार्क पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात चंदनाच्या झाडाची चोरी झालेबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात तपास पथकाचे अधिकारी व स्टाफ असे पेट्रोलिंग करित असताना पोलीस नाईक विवेक जाधव व प्रविण पडवळ यांना त्यांचे गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, चंदनाची झाडे चोरणारे दोन इसम दुचाकीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात लेन नं.५ मध्ये चंदनाचे झाडांची रेकी करत फिरत असलेबाबत कळविले असता सदर बातमीचा आशय मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस ठाणे यांना कळवून लागलीच लेन नं.५ कोरेगाव पार्क येथे चंदनाच्या झाडाची चोरी करणेकरिता आलेले दोन इसम यांना तपास पथकाचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता व त्यांचे ताब्यात असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना लागलीच स्टाफचे मदतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे घेवुन येवुन त्यांचकडे कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी केलेबाबत अधिक तपास केला असता त्यांनी कोरेगाव पार्क पुणे येथे चंदनाच्या झाडाची चोरी केले असलेबाबत सांगितले ताब्यात घेतलेल्या इसमांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचे नाव व पत्त्याबाबत विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) फारूख कदीरखों शोगन वय २० वर्षे, रा. जनजाला गाव ता. सिल्लोड औरंगाबाद, २) सिराज निजाम लडावत वय २२ वर्षे रा. जनजाला गाव ता. सिल्लोड औरंगाबाद असे असल्याचे सांगितले, चंदनाच्या झाडाची चोरी करणारे इसमाकडे सीसीटीव्ही मध्ये दिसणारे त्यांचे इतर साथीदारांबाबत माहिती विचारली असता त्यांनी त्यांची नावे ५) हारूनशा रा. कटोरा बाजार ता. भोकरदन जि. जालना, २) मशिद / मकसूद नसीब गोलवाड रा. कटोरा बाजार ता. भोकरदन जि. जालना, ३) नसीब रा. गाव माहुली ता. सिल्लोड जि. औरंगाबाद, ४) मुजीब रा. गाव माहूली ता. सिल्लोड जि. औरंगाबाद, ५) अनीस रा. कुंदखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद ६) अनीस रा. गाव माहूली ता. सिल्लोड जि. औरंगाबाद. ७) पिनु बाबुराव गालफाडे रा. निपाणी वडगांव नेवासा रोड श्रीरामपुर (चंदनाचे ओंडके घेणारा). ८) इलियासखाँ नजीरखॉ पठाण रा. माहूली आडगाव औरंगाबाद (चंदनाचे ओंडके घेणारा) असे असलेबाबत सांगितले आहे. वर नमुद अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केले असलेबाबत निष्पन्न झाले आहे. १) कोरेगाव पार्क पो.स्टे. गु.र.नं. १७/२०२३ भादंवि कलम ३७९.४२७ २) कोरेगाव पार्क पो.स्टे गु.र.नं ६०/ २०२३ भादविक ३९५. ४१२,३७९..मुं.पो. अॅ.क. ३७ (१) १३५ अशाप्रकारे सोसायटीचे चॉचमन यांना हत्याराचा धाक दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी करणारे सराईत टोळीस अटक करुन “कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने” एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व चंदनाच्या झाडाची चोरी केलेले ओंडके असा किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि दत्तात्रय लिगाडे हे करित आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम), पुणे शहर श्रीमती. स्मार्तना पाटील, मा. पोलीस उप आयुक्त सो. परि. २ पुणे शहर, श्री. आर. एन. राजे सहा पोलीस आयुक्त सो, लष्कर विभाग पुणे श्री. विनायक वेताळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर श्रीमती दिपाली भुजबळ(गुन्हे) कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी स.पो.नि दत्तात्रय लिगाडे, पोउनि संभाजी नाईक, पोलीस अंमलदार सपोफी नामदेव खिलारे, पो. हवा. अमर क्षिरसागर, पो. हवा. विशाल गाडे, पो. हवा. संदिप जबर पो.हवा. विलास तोंगे. पोहवा रमजान शेख, पो.ना. गणेश गायकवाड पो.ना विवेक जाधव, पो.ना नितीन रावळ, पो.ना.प्रविण पडवळ यांनी पार पाडली.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

18 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago