वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा.

चिमुकल्यांनी केक कापून तसेच वृध्द सेवाश्रम मधील वृद्ध माता पिताना मिठाईने तोंड गोड करून साजरा केला वाढदिवस.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सांगली दि. १० मे वंचित,पीडित आणि दुर्लक्षित घटकांचा बुलंद आवाज,महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील अग्रगण्य नेत्यांमधील एक अभ्यासू, विद्वान नेतृत्व, ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्द सेवाश्रम मध्ये राहात असणारे वृध्द आई व बाबांना मिठाई खाऊ घालुन त्याचबरोबर श्रमिक, कष्टकरी व बांधकाम कामगारांची मोफत ऑनलाईन कामगार नोंदणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, विश्वशांती बौद्ध विहारात लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाच्या केक कापण्यात आला.

श्रमिक नगर मधील कष्टकरी बांधकाम कामगारांच्या गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले जेणेकरून कामगार बंधू – भगीणींच्या मुलां मुलींना शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहावे.शिक्षणाच्या वाटेवर जे गेले ते आयुष्याचा वाटेत यशस्वी झाले. शैक्षणिक साहित्य हे डॉ.सुधिरजी कोलप, महंमदहनिफ मुल्ला, उद्योगपती रमाकांतभाऊ घोडके, दिलीप गाडे आणि सुरेश आठवले यांनी उपलब्ध करून दिले. याचबरोबर सर्वांना आपले हक्काचे कार्यालय असावेत कामगार बांधवांचे अडचणी समजुन घेता यावे म्हणुन बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवस निमित्ताने “प्रकाश पर्व” असे जिल्हा संपर्क कार्यालयाचे नामकरण करून कार्यालय सर्वांच्या साठी सूरू करण्यात आले. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या मार्फत, बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवसाच्या दिनी विविध उपक्रमांचे उत्तम नियोजन वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संघटक तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी केले.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवस मोठ्या आनंदात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब तसेच सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संघटक संदिप कांबळे,
कवठेमहांकाळ तालुका महासचिव विज्ञान लोंढे, सचिन वाघमारे, सांगली शहर अध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश माने, जिल्हा उपाध्यक्ष मानतेश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मिरज तालुका महासचिव सागर आठवले,आनंद कांबळे, विक्रांत सादरे, शिवकुमार वाली, विक्रांत गायकवाड, शुभम भंडारे,मऱ्याप्पा राजरतन, असलम मुल्ला, प्रदिप मनचद, बंदेनवाज राजरतन,संगाप्पा शिंदे, मंजूनाथ कांबळे यांच्या बरोबर पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य आणि कामगार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

21 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago