उमराणी शिक्षण प्रसारक मंडळाचा 40 वा वर्धापन दिन व अरविंद घोष यांची 150वी जयंती साजरी.

महावीर मडीमनी, सांगली प्रतिनिधी
सांगली:-
उमराणी शिक्षण प्रसारक मंडळाचा 40 वा वर्धापन व योगी अरविंद घोष यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संपूर्ण देशात आणि राज्यात यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. समाजात स्वावलंबन, देशाभिमान, सुसंस्कार निर्माण व्हावा म्हणून उमराणी शिक्षण प्रसारक मंडळाचा मागील 40 वर्षापासून निरंतर आपले कार्य करत आहे. आणि पुढेही हे कार्य असच सुरू राहणार असल्याचे असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले कृष्णराज डफळे यांनी व्यक्त केले.

आज उमराणी शिक्षण प्रसारक मंडळाला 40 वर्ष पूर्ण झाली आहे. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे अमूल्य असे कार्य उमराणी शिक्षण प्रसारक मंडळ करत आहे असे मनोगत प्रामुख्याने उपस्थित असलेले बाबुराव कांबळे सर, उमराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश चव्हण सर यांनी केले.

या कार्यक्रमात प्रामुख्यान उपस्थित असलेले हनुमंत काळे सर, प्रकाश कवडीकर सर, मयूर संतोष बळीकरे, चनकोठी शिंदे सर, सुर्यवंशी सर, शंकर करजंगी, संतोष उमराणी तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महावीर मडीमनी हे उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

4 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

5 hours ago