हडपसर पोलीसांची धडक कारवाई ४ दिवसात ४ महत्वाचे गुन्हाच तपास करून उघड, अनेक आरोपीला ठोकल्या बेड्या.

ज्वेलर्सचे हातचलखीने चोरलेले सोने जप्त.
नैसर्गिक मत्यूचा बनाव केलेला खून उघडकीस.
अनेक गंभिर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीस अटक.
हातभट्टी दारूचा मोठा साठा वाहनासह जप्त.

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलीस आता ॲक्शन मोड वर आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हडपसर पोलीसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे गुन्हेगाराचे चांगलेच धागे दणकावले आहे. अशाच हडपसर पोलीसांनी चार वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई करत अनेक आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

पहिल्या घटनेत: फिर्यादी मुकेश परमानंद सोनी वय ४५ वर्षे, यांचे लक्ष्मी ज्वलेर्स नावाचे भेकराईनगर हडपसर पुणे येथे दुकान असून दिनांक- ०५/०५/२०२३ रोजी सायंकाळी १९/३० वाजताचे सुमारास त्यांचे दुकानात तीन महिला व त्यांचेसोबत एक लहान मुलगी येवुन दुकानातील कामगारांना वेगवेगळ्या सोन्याच्या वस्तु दाखवण्यास सांगून, त्यांची नजर सोन्याचे नाकातील चमकी वजन १२ ग्रॅम हे हातचलाखीने चोरून नेल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं. ६९८ / २०२३ भा.द.वि. कलम ३८० गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांचे दुकानात सीसीटीव्ही फुटेज असल्याने तपासपथक अधिकारी सपोनिरी विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर यांनी सीसीटीव्ही पाहीले. त्यामध्ये ३ महिला व त्यांचे सोबत लहान मुलगी दिसली. सीसीटीव्ही मधून दुकानातील आरशामध्ये लहान मुलीने दागिने हातचलाखीने चोरून जिन्स पॅन्टमध्ये लपवत असलेबाबत दिसून आले. सीसीटीव्ही पडताळणी करीत असताना मिळालेले फुटेज व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपी महिला या रिक्षातुन बसून गेलेल्या दिसल्या. तपासपथक टिमने सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज हडपसर ते पदमा प्यान चेक करून आरोपी महिला निष्पन्न करून १) सविता मनोज चव्हाण वय ४७ वर्षे, रा. शिवरामदादा तालीमजवळ, ५० गणेश पेठ पुणे. २) वर्षा योगेश चव्हाण रा. शनि मंदिरा शेजारी चव्हाणनगर पुणे. ३) स्नेहा शैलेंद्र पवार वय २५ वर्ष रा. चाळ नं. ३, कृष्णानगर महम्मंदवाडी पुणे. ४) विधीसंघर्षग्रस्त मुलगी यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिली. आरोपी महिलांकडून सोन्याचे नाकातील चमकी वजन १२ ग्रॅम किं. रू ४५,०००/- चे हस्तगत करण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत: दिनांक ०९/०५/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून हडपसर पोलीस स्टेशनला एमएलसी कळवीण्यात आली. त्यामध्ये मयत रवी सुर्यभान क्षिरसागर वय ५१ वर्ष रा. मांजरी पुणे यास दारूचे व्यसन होते व ते राहते घरी बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने त्यांना उपचार कामी ससुन हॉस्पीटल येथे आणले असता उपचारपुर्वी डॉक्टारांनी मयत घोषीत केले. मयताचे इनक्वेस्ट पंचनाम्यामध्ये गळ्याजवळ व्रण व पाठीवर मारल्याचे व्रण दिसून आले. डॉक्टरांनी मयताचा गळा दाबलेला व त्याचेवर व्रण असलेले अॅडव्हांन्स सर्टीफिकेट दिले. या गुन्ह्याचे तपासात अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सपोनिरी. विजयकुमार शिंदे, पोउपनिरी. अविनाश शिंदे आणि सपोनिरी. नानासाहेब जाधव यांनी नियोजन करून मयातचे घरातील लोकांनी धार्मिक विधी उरकल्यानंतर फिर्यादी यांचे घरातील इसमांची चौकशी करीत असताना, मुलगा नामे ओंकार रवि क्षीरसागर वय २७ वर्षे हा वेळोवेळी वेगवेगळी माहीती देत असल्याने त्यास पोलीस ठाणेस घेवून त्याचेकडे अधिक तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी मुलगा याने सांगीतले की, मयत वडील यांनी त्यास शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन काठीने मारहाण करुन गळा दाबून त्याचा खुन केल्याचे सांगीतले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत: हडपसर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरिल आरोपी ज्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, विनयभंग अशा प्रकारचे अनेक गंभिर गुन्हयांमध्ये पाहीजे असलेला आरोपी आशिष मारुती धणके वय २४ वर्षे, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे हा फरार झालेला होता. त्यास वेळोवेळी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून येत नव्हता. पोलीस अंमलदार अजित मदने आणि चंद्रकांत रेजीतवाड यांना गोपनीय माहीती मिळाली की, आरोपी हा सध्या लोहारा, धाराशिव या भागात आहे. पोलीस अंमलदार समिर पांडुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड आणि कुंडलीक केसकर यांची टिम सदर भागत जावून आरोपीचा शोध घेत असतना आरोपी हा अण्णुर ता. आळंद जिल्हा कर्नाटक येथे गेला असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे आशिष मारुती धणके वय २४ वर्ष, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे यास ताब्यात घेण्यात आले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुशील डमरे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

चौथा घटनेत: दिनांक १३/०५/२०२३ रोजी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत तपासपथकातील अधिकारी पोउपनिरी अविनाश शिंदे / अंमलदार सुशील लोणकर, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अजित मदने, कुंडलीक केसकर असे अवैद्य धंदे बंद अनुषंगाने पेट्रोलींग फिरत असताना, रासगे आळी, हडपसर पुणे येथील मोकळ्या जागेत इसम नामे भिमा मारूती गायकवाड वय ३३ वर्ष रा. रासगे आळी शेजारी, पत्र्याचे शेडमध्ये हडपसर पुणे विकास संभाजी लिंगायत वय २३ वर्ष रा. सदर यांनी विक्रीकरीता महिंद्रा टॅम्पो मधून आणलेले २५ दारूचे कॅन्ड त्यामध्ये ८७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू सह मिळून आल्याने कारवाई करून किं. रू ५,७५,००० चा माल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी ही रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबडे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, अजित मदने, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

21 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago