लोणीकंद पोलीसांनी खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपींना कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासात ठोकल्या बेडया.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626


लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १३/०५/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर येथे प्राप्त खबरीच्या अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व स्टाफ रोहन अभिलाषा सोसायटी जवळ, मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी तिवारी यांचे मौजे वाघोली गट नंबर ५११ या मिळकतीकडे जाणा-या कच्च्या रोडवर, वाघोली, पुणे या ठिकाणी एक पुरुष जातीचे अंदाजे ३० ते ३५ वय असणारा इसम बेशुध्द व रक्ताचे थारोळ्यात जखमी अवस्थेत दिसुन आला होता. त्यावेळी सदरचा इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव गळ्यावर कोणत्यातरी धारधार हत्याराने वार करुन जिवे ठार मारले असल्याचे समजुन आले. नमुद घटनास्थळी एक दुचाकी देखिल मिळुन आल्याने पोलीसांनी दुचाकी वरील नंबरची माहिती प्राप्त करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करून बेशुध्द व जखमी अवस्थेत मिळुन आलेल्या इसमाचे नाव गौरव सुरेश उदासी, रा. लेन नंबर २, डॉ. सुरेश उदासी हाऊस, रामपुरी, कॅम्प, अमरावती याची असल्याचे व तो सध्या रा. साई हर्षीत पीजी, लेन नंबर २, गणपती हौसिंग सोसायटी, तुकारामनगर, खराडी, पुणे असे असल्याचे समजुन आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. महादेव लिंगे यांनी मयत इसमास अज्ञात इसमाने जिवे ठार मारले असल्याने अज्ञात इसमाविरुद्ध सरकारतर्फे भादंवि कलम ३०२ प्रमाणे फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता…

नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशित केले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने पोलीस नाईक अजित फरांदे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन व गोपनीय बातमीदारा मार्फत प्राप्त माहिती नुसार सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) भगवान सदाशिव केंद्रे, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे २) अमोल तुकाराम मानकर, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे याने केला असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने व नमुद आरोपी हे परभणी जिल्हा व वाशिम जिल्हा येथे पळुन गेले असलेबाबत खात्रीशीर माहिती दिल्याने मा. श्री. गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ दोन टिम तयार करुन एक टिम परभणी जिल्हा येथे व एक टिम वाशिम जिल्हा येथे रवाना केली. त्यानंतर सपोनि निखील पवार व पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे. पोहवा बाळासाहेब सकाटे, पोशि अमोल ढोणे यांचे टिमने परभणी जिल्हा येथील गंगाखेड पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफच्या मदतीने आरोपी नामे भगवान सदाशिव केंद्रे, रा. भावडी रोड, वाघोली, पुणे यास मु.पो. धारासुर, ता. गंगापुर, जि. परभणी येथून ताब्यात घेतले. तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोना. अजित फरांदे, स्वप्निल जाधव, कैलास साळुंके यांचे टिमने आरोपी नामे अमोल तुकाराम मानकर, रा. भावडी रोड, बाघोली, पुणे यास मु.पो. भुर, ता. मंगळुरपीर, जि. वाशिम येथून ताब्यात घेतले. त्यानंतर नमुद आरोपीना लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आणुन अधिक चौकशी केली असता नमुद आरोपींनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक केलेली आहे. गुन्हयाचा अधिक तपास श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे. लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशिकांत बोराटे साो, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. किशोर जाधव साो, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गजानन पवार सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मा. श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, सपोनि निखिल पवार, सपोनि रविंद्र गोडसे, पोउपनिरी सुरज गोरे, पोउपनिरी राहुल कोळपे, पोउपनिरी महादेव लिंगे, सहा. पोलीस फौजदार अस्लम अत्तार, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक विनायक साळवे, अजित फरांदे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, सागर जगताप, पोलीस शिपाई अमोल ढोणे, साई रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण, सुभाष भुरे, शंकर क्षीरसागर, अशोक शेळके, तुषार पवार सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे….

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

14 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 days ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago