मुंबई: दारूच्या नशेत वेगाने कार चालविल्याने भीषण अपघात, तब्बल 30 मीटर उंच उडाली कार; तरुणीचा जागीच मृत्यू.

मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक अपघाताची खळबळजनक घटना समोर आली आहे. दारूच्या पिऊन नशेत वेगाने कार चालविल्याने एका तरुणीला जीव गमवावा लागल्याची दुर्घटना जुहू येथे शुक्रवारी पहाटे घडली. मयत तरुणीचे नाव पल्लवी भट्टाचार्य असे असून ती मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे. या अपघातात तीन जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की गाडी जवळपास 30 मीटर उंच हवेत उडाली आणि खाली पडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्वर्यू बांदेकर वय 27 वर्ष, पल्लवी भट्टाचार्य वय 29 वर्ष, भारती राय वय 24 वर्ष आणि अंकित खरे वय 38 वर्ष यांनी मिळून साकीनाका परिसरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये पहाटे तीनपर्यंत पार्टी केली. त्यानंतर मर्चंट नेव्हीत असलेल्या अध्वर्यूने उर्वरित तिघांना बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांच्या हॉटेलात सोडण्याचा निर्णय घेतला. दारूची नशा आणि कारचा वेग यामुळे बांदेकरला अंधारात स्पीड ब्रेकर दिसला नाही. परिणामी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कचरा व्हॅनवर धडकली असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की पल्लवीचा जागीच मृत्यू झाला. बांदेकर अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला संकुलातील डीएलएच ऑर्किड टॉवरचे रहिवासी आहेत, तर भट्टाचार्य पश्चिम बंगाल, राय शिमला येथील आणि खरे हे हरियाणाचे रहिवासी आहेत. भारती एका एअरलाइनमध्ये केबिन क्रू मेंबर आहे, तर अंकित हा एका व्यावसायिकाचा मुलगा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. जुहू पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅटू मिटवण्यासाठी आली होती मुंबईत:
पल्लवी ही एअरहोस्टेस होती. मात्र, तिची कंपनी दिवाळखोरीत गेल्यामुळे तिची नोकरी गेली. त्यानंतर दुसऱ्या एअरलाइन्स कंपनीत तिची निवड झाली होती. मुलाखतीदरम्यान तिच्या हातावर टॅटू असल्याचे दिसले. त्यामुळे एअरलाइन्सने तिला टॅटू काढून कामावर रुजू होण्यास सांगितले. तो टॅटू मिटवण्याचा ट्रीटमेंटसाठी ती मुंबईत आली होती. दरम्यान, तिचा ज्या गाडीमुळे जीव गेला त्या गाडीचा वेग 120 किमी प्रतितासाहून अधिक होता.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago