” रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईत आरोपी कोंढवा पोलीसाकडुन पुन्हा अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ४४२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल असणा-या गुन्हयात टाटा कंपनीची एम.एच. ३२ वी ४६०५ हा चोरीस गेला होता. सदर गुन्हा करणा-या अज्ञात आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर आरोपी याचा शोध तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि. ८६४६ जयदेव भोसले, पो.शि. ८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.शि. १००७५ राहुल रासगे, पो शि १००१८ नितेश शेलार, पो ना. ६९४६ राहुल वंजारी असे गुप्त बातमीदारामार्फतीने तसेच घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाच्या आजुबाजुस सीसीटिव्हि फुटेज मध्ये आरोपी हा गाड़ी चोरी करताना दिसत आहे का? यादृष्टीने शोध घेत होतो.

यापुर्वी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गुरन. ७२३ / २०२२ भादवि कलम ३७९ मधील गुन्हयातील टेम्पो व इतर गाडया हया आरोपी ईस्माईल शफी सय्यद, वय ४४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गल्ली नं.०४, कोंढवा बु. पुणे याने चोरी केलेल्या होत्या. त्यामुळे दाखल गुन्हयातील टेम्पो ही ईस्माईल शफी सय्यद याने चोरी केला असल्याबाबत संशय होता. त्याअनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फतीने आरोपी याच्याबाबत माहिती घेत असताना दाखल गुन्हयात चोरी केलेला टाटा कंपनीचा टेम्पो एलपीटी ९०९ तीचा आरटिओ क्रं.एम.एच.३२ बी ४६०५ हा आरोपी ईस्माईल शफी सय्यद, वय ४४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गल्ली नं.०४, कोंढवा बा पुणे हा विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याबाबत माहिती पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात यांना गुप्त बातमी मिळाली होती. आरोपी याचा शोध घेवुन दिनांक ०८/०५/२०२३ रोजी पकडुन अटक करुन त्याची मा. न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी घेवुन सखोल तपास करुन त्याच्याकडुन १ ) टेम्पो क्रं. एम. एच. ३२ बी ४६०५ २) पल्सर मोटार सायकल एम. एच. १२ क्यु. व्हि. ४५२४, ३) अँटिव्हा ५ जी मोटार सायकल एम. एच. १२ क्यु.यु. ११४८, ४) रिक्षा क्र एम. एच. १२ क्यु. ई. ७६९६, ५) युनिकॉन एम. एच. १२ पी. एफ.८३१० हया गाडया चोरी करुन पोलीसांनी पकडु नये म्हणुन वेगवेगळया ठिकाणी सोडुन दिल्याचे सांगितले. आरोपी यांच्याकडुन ५ लाखाच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी याने मागिल वर्षेही कोंढवा पोलीस ठाणेच्या हद्दीतुन ५ गाडया चोरी केल्याचे उघड झाले होते.

सदर आरोपी याने पुढीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

१) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन.६६८/२०२२ भादवि कलम ३७९
२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. २०६ / २०२२ भादवि कलम ३७९
३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. ४३६/२०२२ भादवि कलम ३७९
४) कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन ६७२ / २०२२ भादवि कलम ३७९
५) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ७२३/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९

वरिलप्रमाणे कारवाई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त,वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago