सुरजागड येथील लोह प्रकल्प जनतेसाठी अभिशाप तात्काळ बंद पाडावे.अन्यथा रस्त्यावर उतरून काम बंद करू

माजी जि.प.अध्यक्ष अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचा कडकडीचा इशारा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली येथे बहुचर्चित सुरजागड येथून दररोज मोठ्या प्रमाणात लोहखनिज उत्खननाचे काम सुरू असून हे लोहखनिज जडवाहनांने बाहेर नेत असतांना जडवाहनांचे चालक हे भरधाव वेगाने आपले वाहन चालवीत असल्याने या वाहनांच्या धडकेत अनेक निष्पपांची लोकांची बळी जात असल्याने यावर राज्यसरकार जोपर्यंत योग्य तोडगा काढणार नाही तो पर्यंत कंपनीने लोहखनिज उत्खननाचे काम बंद पाडावे, अन्यथा रस्त्यावर उतरून जेलभरो जनआंदोलन उभारण्याची इशारा, आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथून लोहखनिज वाहतुकीचे जडवाहनांमुळे विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली ते आष्टी पर्यंत संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली असून या मार्गावर मोठमोठे शासनाचे खड्डे पडल्याने अनेक अपघात होत आहे. या अपघातां मुळे सुद्धा अनेक निष्पपांची नाहक बळी जात आहे. याला कारणीभूत फक्त लॉयड अँड मेटल कंपनी जबाबदार आहे.काल आष्टी जवळ या कंपनीच्या जडवाहनाच्या भरधाव वेगामुळे एका बारा वर्षीय चिमुकलीची जीव गमवावे लागले. याअपघाताला कंपनीच सर्वस्वी जबाबदार आहे. या कंपनीच्या जडवाहनांमुळे यापुढे सुद्धा असेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून राज्य सरकारने या गंभीर समस्या विषयी योग्य पाऊल उचलून निरपराधांची नाहक बळी घेणाऱ्या या कंपनीकडून होणाऱ्या लोह उत्खननाचे काम बंद पाडण्यात यावी, अन्यथा आविस रस्त्यावर उतरुन कंपनीची कामच बंद पाडू असा इशाराही कंकडालवार यांनी दिली आहे.

सुरजागड प्रकल्प हे या क्षेत्रातील नागरिकांसाठी अभिशाप ठरले असून सरकार व कंपनी मिळून रोजगाराचे नावाखाली सुशिक्षित तरुण व तरुणींचे भ्रमनिरास केले आहे. या कंपनीचे काही दलाल कंपनीकडून लोह उत्खनन सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत मलाई खात असून सर्वसामान्य नागरिक व बेरोजगारांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लॉयड व मेटल कंपनीच्या लोह खनिज वाहतूक करणाऱ्या जडवाहनांमुळे आलापल्ली ते आष्टी या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या शेतांमध्ये धूळ पसरून शेतकऱ्यांची उभी पीके नष्ट झाले. शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा दिवस साखळी व आमरण करून नुकसानभरपाई साठी कंपनी व राज्यसरकारकडे मागणी केली होती. परंतु आज पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कवडीचीही भरपाई मिळालेली नाही. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन रस्त्यावर आलेलं आहे. जुन महिन्यापासून परत शेतीच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. परत शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या कंपनीमुळे शेतकरी हवालदील झालेलं आहे.

सुरजागड येथील लॉयड व मेटल कंपनीने मद्दीगुडम येथे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व वनविभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नियंमबाह्यरित्या डम्पिंग यार्ड बनविले. या डम्पिंग यार्डमुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाले. येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत बहुमताने ठराव पारित करून डम्पिंग यार्ड बंद करण्याची मागणी केली. परंतु यावर सरकार उदासीनता दाखवीत आहे. येथील नागरिकांची सदर डम्पिंग यार्ड त्वरित बंद करण्याची मागणी आहे. कंपनीने सुरजागड येथेच आपल्या मनमानीने जंगलतोड करून अवैधपणे अंदाजे दोन की.मी. रस्त्याची बांधकाम केले याअवैध बांधकाम कडे संबंधित विभागाचे लक्षच नाही आहे. लॉयड व मेटल या कंपनीकडून सुरू असलेल्या लोह खनिजाची वाहतुकीमुळे आल्लापल्ली ते अहेरी ते आष्टीपर्यंत संपूर्ण रस्त्याची चाळणी झाल्याने या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावं लागतं आहे. या भागातील नागरिकांना आल्लापल्ली किंवा अहेरीच्या आठवडी बाजाराला येण्यासाठी ही अवजड जात आहे. या रस्त्याची चाळणी झाल्याने नागरिकांना आरोग्य सुविधा घेण्यासाठीसुद्धा तारेवरची कसरत करावं लागतं आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात संबंधित कंपनीची खुलेआम मनमानी कारोभार सुरू असून या कंपनीवर राज्यसरकार गंभीर नसल्याचे यावेळी दिसून येत आहे.

सुरजागड प्रकल्पामुळे या क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक समस्या उदभवत असल्याने राज्य सरकार या सर्व समस्यांविषयी तात्काळ योग्य दखल न घेतल्यास जेलभरो जनआंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हंटले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago