नाव खरे पण काम लाचखोरी, संचालका विरोधातील सुनावणी मध्ये मदत करण्यासाठी 30 लाखाची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक अटक.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे सह एका वकिलाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही घटना समोर येतात संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री केली.

लाचखोर अधिकारी सतिश भाऊराव खरे वय 57 वर्ष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-1 रा. आई हाईट्स, कॉलेज रोड, ॲड. शैलेश सुमातीलाल सभद्रा वय 32 वर्ष, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड अशी लाचखोर आरोपीची नावे आहेत.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. सदरची लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.

घराची झडती घेण्यात आली.
लाच घेतल्या नंतर लाचखोर अधिकारी सतिश भाऊराव खरे यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी विभागाचे अपरधीश नारायण निहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या कॉलेज रोडवरील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

21 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago