मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयास राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे यांचे नाव देण्यात यावे सेवक लोकहित मंच ची मागणी.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयास राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सेवक लोकहित मंच यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी या नावाने सर्वत्र नावलौकिक आहे. येथील उत्तम उपचारासाठी व्यवस्था असल्याने आपल्या शेजारच्या इतर जिल्हा व कर्नाटक राज्यातील सुध्दा अनेक गोर-गरीब, मजूर, मध्यम वर्गीय रुग्ण मोठ्या प्रमाणात मिरज शहरात उपचारासाठी येतात तसेच उत्तम उपचारानंतर बरे होऊन आपल्या कुटुंबात परत जातात. ह्या मध्ये सर्वात महत्वाचा योगदान हे शासकीय रुग्णालयाचे आहे. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत सुध्दा संपूर्ण महाराष्ट्रात सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात ह्याच शासकीय रुग्णालयाचा वाटा होता तसेच रुग्ण बरे करण्याची सरासरी सुध्दा जास्तच होती. रूग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असुन गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, परंतू अद्यापपर्यंत ह्या शासकीय रुग्णालयास आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणतेच विषेश असे नाव देण्यात आले नाही. आणि भविष्यात कोणत्या तरी राजकीय नेत्यांचे नाव देण्यात येईल याची शंका नाकारता येत नाही म्हणून आम्ही आमच्या “सेवक लोकहित मंच” कडुन जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली की कोणत्याही राजकीय नेत्यांची नावाची मागणी होण्या आधीच आपल्या कारकिर्दीत या दोन्ही आस्थापनास राजश्री छत्रपती शाहु महाराजांचे नाव देऊन शाहु महाराजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, दूरदृष्टी असलेल्या कार्याचा गौरव सन्मान करावा. आमच्या या मागणीचे योग्य विचार करुन लवकरात लवकर निर्णय घेऊन मिरज शासकीय रुग्णालय आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयास राजश्री छत्रपती शाहु महाराजांचे नाव देण्यात यावे.

यावेळेस संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी, संजय कांबळे, अनिल मोरे, प्रशांत कदम, विज्ञान लोंढे, प्रथमेश बनसोड आदि उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

6 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

6 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

7 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

7 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

7 hours ago