पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज !ऑनलाईन पुणे :- दिनांक २८/०४/२०२३ रोजी पहाटे ०२.१५ या चे सुमारास डी. पी. कलेक्शनच्या समोर, जिजामाता चौका चिंतामणी ज्ञानपीठ या ठिकाणी जाणारे रोडवरती आंबेगाव पठार पुणे येथे फिर्यादी हे त्यांची चारचाकी पार्क कर लघुशंका करता थांबले असताना ३ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी मारहाण करून त्यांना शिवीगाळ कर त्यांचेकडील रुपयांची एक सोन्याची चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम जवरदस्तीनं चोरी केली आ तसेच सदर तीन इसमानी चिंतामणी ज्ञानपीठ समोरुन सहफिर्यादी टँकर चालक यांचा २०००/- रुपये किंमती मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी केला आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्या आला आहे.
गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले यांना त्या गोपनीय बातमीदारामार्फेतीने माहीती मिळाली की, दिनांक २८/०४ / २०२३ रोजी पहाटेच्या वेळी चिंतामणी ज्ञानपीठ आंबेगाव पठार येथे रेकॉर्डवरील आरोपी समीर शेख, सिध्दार्थ व त्याचा एक साथीदार असे तिघांन मिळुन एका कार चालकास लुटले आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी अमलदार यांनी आरोपीतांचा शोध घेतला असता वालवेकर लॉन्स, ट्रेजर पॉईन्टशेजारील नाल्याचे पुलाजवळ आरोप १. समीर रज्जाक शेख, वय २३ वर्षे, रा. ५४/२ लेन नंबर ०२ अण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे २. सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २१ वर्षे, रा. ५४/२ लेन नंबर ०२ अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर पुणे हे मिळुन आल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करीत असताना आरोपी सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २१ वर्षे, रा. ५४/२ लेन नंबर ०२ अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, पुणे हा तडीपार निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेली ३०,०००/- रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 *पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण…