जळगाव: शेतकऱ्यांनो सावधान बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुक, 6.78 मेट्रिक टन खत साठा पोचोऱ्यातून जप्त.

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाकडून धडक कारवाई सुरू केली आहे. अशाच एका कारवाईत पाचोरा येथील गोडाऊन येथून विनापरवाना अनधिकृत खत साठा आढळून आला. त्यामुळे कारवाई करत तो साठा जप्त करण्यात आला.

लवकरच खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे. या दरम्यान बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. त्यात बोगस बी बियाणे विक्री करणारी टोळी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

काही ठिकाणी विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. याला आळा घालण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ आणि जळगांव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळयाचे नियोजन करण्यात आले.

त्यानुसार जळगांवचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी पाचोरा येथे येऊन पाचोरा येथील उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, कृषि अधिकारी, पंचायत समिती, कृषि पर्यवेक्षक अविनाश चंदीले यांना सोबत घेऊन पाचोरा तालुक्यातील जारगांव येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गोडावूनची तपासणी केली. यावेळी पथकाला विनापरवाना अनधिकृत खत साठा आढळून आला. याबाबत गोडावून मालकाची विचारपूस केली असता हे गोडावून काही दिवसांपुर्वी दिपचंद्र श्रीवास यांना भाडयाने दिल्याचे सांगीतले. या विनापरवाना व अनधिकृत खत साठयाबाबत दिपचंद्र श्रीवास यांना मोबाईलद्वारे संपर्क साधुन गोडावून व कंपनीचा परवाना मागीतला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान सदर पथकाने गोडावुनची झाडाझडती घेतली असता या गोडावूनमध्ये रुपये 2 लाख 38 हजार 629 किमतीचा 6.78 मेट्रिक टन खत साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करु नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांचे मोबाईल 8983839468 आणि दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

नागपुरात बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने युवकांना बेदम मारहाण करून रोख रुपये व सोनसाखळी लुटून फसार.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

37 mins ago

शंकर ढोलगे यांना शाहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना…

51 mins ago

*मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी*. मोबाईल नं. 9420751809 *शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले*…

1 hour ago

70 वर्षात मूलभूत समस्या न सोडवू शकणाऱ्या नेत्यांना गाव बंदी करा संदीप कोरेत यांचे भेटी दरम्यान जनतेला आवाहन.

*पुसुकपल्ली झिंगाणुर. पूल्लीगुडम गावाला दिली भेट* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809. सिरोंचा तालुक्यातील…

1 hour ago

हिंगणघाट येथे तुळसकर फार्मसी महाविद्यालयाला मंजुरी प्रदान, आमदार समीर कुणावार यांचे पाठपुराव्याला यश.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध व्यवसायिक…

2 hours ago