येरवडामध्ये पाण्याची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया, आधिकाऱ्याचे दुर्लक्ष नागरिक मात्र त्रस्त.

शैलेश ओव्हाळ, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील येरवडा प्रभाग क्रं 9 दर्शनक रिक्षा स्टँन्ड गाडीतळ चौक येथे मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्याच परिसरातून येरवडा भागाला पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी आहे. ती जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने स्थानिक नागरिक हळहळ करत होते.

सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात तापत आहे. त्यात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. अनेक परिसरात वॉटर ट्रंकर ने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात अशा प्रकारे हलगर्जी करून पाणी वाया जात असेल तर महानगर पालिका प्रशासन आणि मनपा पाणी पुरवठा विभागावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

येरवडा परिसरात जलवाहिनी फुटल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागास कळवून देखील ते फिरकले नसल्याचे गणेश घायमुकते सामाजिक कार्यकर्ते येरवडा, सुहास फुलचंद कांबळे प्रभाग प्रमुख येरवडा शिवसेना यांनी सांगितले. जलवाहिनी फुटल्यामुळे सगळा परिसर जलमय झाला आहे.

यावेळी गणेश घायमुकते, सुहास फुलचंद कांबळे यांनी सांगितले की, 23 एप्रिल 2023 रोजी पाणी गळतीची तक्रार पुणे महानगर पालिकेला व्हॉट्सॲप करून पाण्याचे फोटो पाठविले त्याचा तक्रार नं wa 108407 असा आहे. त्यावेळेस तक्रारीची दाखल घेण्यात आली असती तर आज दि 16 मे 2023 ला पाण्याची लाईन फुटली नसती मी पाणी पुरवठा आधिकारी यांना प्रत्यक्ष पाणी गळती दाखवली त्यांनी उद्या लगेच मेट्रो विभागाला पत्र देतो असे सांगून मी केलेल्या तक्रारी वर दुर्लक्ष केल्यामुळे पाणी लाईन फुटली आहे आणि लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याबाबत आम्ही महानगर पालिकेला ऑनलाईन तक्रार दिलेली आहे तक्रार नं c 82770 हा आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…

2 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…

2 hours ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…

2 hours ago

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

2 hours ago