इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून झाली नांदगाव येथे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय.

नांदगाव गावी आदिवासी बांधवांसाठी ५००० लिटर च्या 2 मोठ्या पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बसविण्यात आल्या.

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई/रायगड:-
ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अजुन पर्यंत मूलभूत अधिकार मिळत नाही असल्याचे वास्तव समोर आले आहे. आज ७५ वर्षे उलटली भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तरी देखील अनुसूचित जमाती वर्गाची परिस्थिती जैसे थे आहे. भारतीय संविधान इथल्या भारतीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देते, पण गेली १० वर्ष ज्या ठिकाणी प्रशासनाकडून घाण पाणी पाजलं जात असे त्या ठिकाणी इंडियन्स सोशल मुव्हमेंट च्या पाठपुराव्याने पनवेल तालुक्यातील नांदगाव गावी आदिवासी बांधवांसाठी ५००० लिटर च्या 2 मोठ्या पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बसविण्यात आल्या.

ज्या रायगड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा संघर्ष केला त्याच रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवाना पाण्याची टाकी बांधून देऊन त्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. भविष्यात ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी इंडियन्स सोशल मूव्हमेंट त्यांनी पाण्याची टाकी उपलब्ध करून देईल आणि अश्या 100 टाक्या आम्ही पनवेल तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी लावू असा एक संकल्प यावेळी केला आहे.

आजच्या पाण्याच्या टाकीच्या उदघाटन प्रसंगी संविधान मार्गदर्शक, लेखक, विचारवंत इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे संस्थापक आनंदा होवाळ, राष्ट्रीय अध्यक्ष सविताताई सोनावणे कदम, मीडिया प्रमुख एवं अनुसूचित जाती जमाती संघर्ष कृती समिती अध्यक्ष प्रकाश कदम तसेच पनवेल अध्यक्ष नरेश परदेशी उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

4 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

5 hours ago