24 मे ला संपूर्ण पुणे जिल्हा हेल्मेट सक्ती, हेल्मेट वीणा मोटर सायकलने प्रवास करू नका.

शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- वाढते अपघाताचे प्रमाण त्यामुळे हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालय आदी शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली.

भारतात दररोज सुमारे ४११ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकल स्वार असतात. हेल्मेट परिधान केल्यास दुचाकी अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर १५ ते २१ मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात ‘७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या, तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृती साठी या सप्ताहा अंतर्गत ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरून येणारे अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करावे याबाबतच्या सूचना द्याव्यात, दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

2 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

21 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

24 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

24 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago